नाशिक – पुणे- नाशिक प्रस्तावित सेमी हायस्पीड लोहमार्गासाठी केंद्रीय वित्त आयोगाने मान्यता दिली आहे. नाशिक-पुणे लोहमार्गाच्या केंद्राच्या वाट्याच्या 20% निधीपैकी 19.5% निधीलाही मान्यता दिली आहे. वित्त आयोगाच्या मान्यतेमुळे नाशिक – पुणे लोहमार्ग मंजुरीचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून आता लवकरच नीती आयोग आणि मंत्रिमंडळाच्या अंतिम मान्यतेनंतर प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
लोहमार्गासाठी राज्य शासनाने यापूर्वीच हिस्याच्या 3200 कोटीला मान्यता दिली यातील 60% निधीची उपलब्धता ही झाली आहे, परंतु गेल्या काही महिन्यांपासून केंद्राच्या 20% हिस्याचा निधी प्रलंबित होता. नाशिक पुणे लोहमार्ग हा महत्वकांक्षी प्रकल्प असून या लोहमार्गामुळे नाशिक, नगर आणि पुणे हे जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत.
नाशिक – पुणे लोहमार्ग हा महत्वांकाक्षी प्रकल्प असून या लोहमार्गामुळे नाशिक – अहमदनगर आणि पुणे हे तीन जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. वित्त आयोगाच्या या निधी मान्यतेच्या निर्णयामुळे नाशिक – पुणे लोहमार्गाचा प्रस्ताव शेवटच्या टप्यात आला आहे. यानंतर सदर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी निती आयोग आणि कॅबिनेटकडे जाणार असून येत्या दोन महिन्यात प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. निती आयोग आणि कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यांत प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.