पुण्यात आमदाराच्या पुतण्याचा कारनामा; भरधाव वेगात कार चालवत दोघांना चिरडले

777 0

खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने भरधाव कार चालवत एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मयुर मोहिते पाटील असे त्याचे नाव आहे. हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर एकलहरे नजीक शनिवारी (22 जून) रात्री घडला. अपघातामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी जमले. बराच काळ घटनास्थळवरील वातावरण तणावाचे होते. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

रविवारी मध्यरात्री पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने सुसाट कार चालवत दोघांना चिरडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ओम सुनिल भालेराव या 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी लागलीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या अपघाताची पाहणी केली. ज्यानंतर या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मयूर मोहिते असे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याचे नाव असून या अपघातावेळी आरोपी मयूर हा मद्यधुंद अवस्थेत होता की नाही, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Share This News

Related Post

मला काही झालं तर संजय पांडे जबाबदार असतील ; मोहित कंबोज

Posted by - April 24, 2022 0
राज्यात सध्या हनुमान चालीसा वरून राजकारण तापले असतानाच राजकीय नेत्यांवर हल्लासत्र सुरू झाले आहे नुकताच भाजपनेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर…
Mumbai High Court

Pune News : फुरसुंगी आणि ऊरळी देवाची नगरपरिषदेच्या भवितव्याचा निर्णय 21 ॲागस्टला

Posted by - August 10, 2023 0
पुणे : महापालिका हद्दीतून फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांना वगळण्याचा आणि या दोन गावांची मिळून नगर परिषद स्थापन करण्याच्या…

राहुल शेवाळे प्रकरणातील पीडितेचे फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी महिला आयोग राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यावर करणार कारवाई

Posted by - December 26, 2022 0
पुणे : राहुल शेवाळे प्रकरणातील पीडितेचे फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी महिला आयोग राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यावर कारवाई करन्यात येणार आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *