पुणे : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे धान्य मोफत; लाभ घेण्याचे आवाहन

288 0

पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असणारे अन्नधान्य १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत पात्र लाभार्थ्यांना मोफत वितरीत करण्याचा निर्णय केंद्र शासनाने जाहीर केला आहे. डिसेंबर २०२२ चे धान्य घेतले नाही अशा लाभार्थ्यांनी जानेवारी २०२३ मध्ये या दोन्ही महिन्यांचे धान्य मोफत प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ, २ रुपये दराने गहू आणि १ रुपये प्रतिकिलो दराने भरडधान्य वितरीत करण्यात येते. तथापि, केंद्र शासनाने २८ डिसेंबर रोजीच्या पत्राने सदर अन्नधान्य सन २०२३ मध्ये मोफत वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे श्रीमती माने यांनी कळवले आहे.

Share This News

Related Post

Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : मीच पुणेकरांच्या हक्काचा उमेदवार; धंगेकरांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी फोडली डरकाळी

Posted by - April 18, 2024 0
पुणे : पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यापूर्वी…

Avinash Bhosale : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर

Posted by - May 18, 2024 0
मुंबई : येस बँक आणि डीएचएफएलच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosle)…
Weather Update

Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हाय अलर्ट

Posted by - April 9, 2024 0
मुंबई : मागील 1-2 दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे.…

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Posted by - June 15, 2023 0
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील जळत्या टँकरमधून अंगावर पडलेल्या पेटत्या इथेनॉलमुळे लोणावळा शहराजवळ अतिदुर्गम ठिकाणी असलेल्या राजमाची या आदिवासी खेड्यातील एकाच कुटुंबातील…

#PATHAN : पठाण २५ जानेवारीला होणार प्रदर्शित, चाहत्यांमध्ये उत्सुकता तरीही शाहरुखला सतावते आहे ‘हि’ भीती

Posted by - January 23, 2023 0
नई दिल्ली : शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुखचे चाहतेच नव्हे तर इंडस्ट्रीही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *