मुंबई – अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह आपल्या विधान परिषद सदस्यत्वचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या गोटात सरकार स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे.
यातच आता शिंदे गटाची गोव्यात सुरू असलेली बैठक संपली असून एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
शिंदे पुढील एक दोन तासात मुंबईत दाखल होणार असून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सत्तास्थापनेविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.