नाना पटोले आणि बच्चू कडू यांचे फोन कोणाच्या नावाने टॅप झाले ? गृहमंत्र्यांनी दिली माहिती

307 0

मुंबई- फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच कुणा-कुणाचे फोन टॅप झाले होते, याचा गौप्यस्फोट केला आहे.

याबाबत बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, “रश्मी शुक्ला यांनी काही फोन टॅप करून त्याचा राजकीय कामासाठी वापर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विधानसभेतही आवाज उठवण्यात आला होता. शिवाय त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी चुकीच्या पद्धतीनं फोन टॅप केले होते, हे अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच त्यांच्यावर करवाई करण्यात आली आहे”

‘रश्मी शुक्ला पुण्याच्या आयुक्त असताना काही राजकीय लोकांचे फोन टॅप केले होते. रश्मी शुक्ला यांनी योग्य ती प्रक्रिया न फॉलो करता फोन टॅपिंग केलं होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांचे फोन टॅप करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती पाटील यांनी दिली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अमजद खान नावाने तर बच्चू कडू- निजामुद्दीन बाबू शेख या नावाने फोन टॅप करण्यात आल्याचे वळसेंनी सांगितलं.

रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत.

Share This News

Related Post

Cough Syrup

Shocking News : धक्कादायक ! खोकल्याचे औषध घेतल्याने 5 जणांचा मृत्यू

Posted by - December 1, 2023 0
नडियाद – गुजरातच्या खेडा जिल्ह्यामधून एक धक्कादायक (Shocking News) बातमी समोर आली आहे. यामध्ये मिथाईल अल्कोहोलचा अंश असलेले आयुर्वेदिक कफ…

टास्क फोर्सच्या बैठकीत मास्क बाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - June 2, 2022 0
राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्स सोबत बैठक घेऊन राज्यातील रुग्णसंख्येचा आढावा…

भारत इतिहास संशोधक मंडळ : शिवकालीन दुर्मीळ गोष्टींचा खजिना

Posted by - January 8, 2023 0
पुण्याच्या भरत नाट्य मंदिराशेजारी असलेली भारत इतिहास संशोधक मंडळाची वास्तू म्हणजे पुण्याचा मानबिंदू ! 7 जुलै 1910 रोजी इतिहासाचार्य वि.…

“जे काही नेत्यांना खुश करायचे ते बंद खोलीत करा !” रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Posted by - October 13, 2022 0
पुणे : भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका भाषणात एक वेळ आई-वडिलांना शिव्या घातल्या तर चालतील…

जुन्नर : पावसाचा हाहाकार, विजांचा लखलखाट, पिंपरी पेंढार येथे काल रात्री पडलेली वीज कॅमेऱ्यात कैद

Posted by - October 18, 2022 0
पिंपरी पेंढार : मंगळवारी रात्री पुणे आणि परिसरात पावसाने हाकाकार केला. भर शहरातले रस्ते अक्षरश: नदी-नाल्यासारखे असल्यासारखे वाहत होते .…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *