‘एकच दणकट बसलं की आईचे दूध आठवेल’, माजी मंत्री तानाजी सावंत यांचे राष्ट्रवादीवर टीकास्त्र

486 0

सोलापूर- निधी वाटपावरून शिवसेनेतील खदखद पुन्हा एकदा बाहेर पडली आहे. अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक निधी दिल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. सत्तेत सोबत आहात ना? मग आमच्यावर कशाला वार करता? असा सवाल तानाजी सावंत यांनी केला.

सावंत म्हणाले अर्थसंकल्पात 65-60 टक्के बजेट राष्ट्रवादीला, 30 ते 35 काँग्रेसला, 16 टक्के शिवसेनेला त्यातही पगार काढावे लागतात. विकास कामाला केवळ 10 टक्के बजेट शिवसेनेला मिळालं आहे, असं सावंत म्हणाले. राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्य देखील कोटी रुपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो. आम्हाला केवळ गोड बोललं जातं. आम्ही केवळ आदेशाची वाट बघतोय, जोपर्यंत सहन होईल तोवर सहन करू. प्रचंड नाराजी आमची राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आहे, असं ते म्हणाले.

सावंत म्हणाले, “सत्तेत सोबत आहात ना? मग आमच्यावर कशाला वार करता? आम्हाला सत्तेत बसायची सवयच नव्हती. शिवसेना विस्थापितांचा गट आहे. कोणीही आजमावून बघू नये. शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते. अर्थसंकल्पामध्ये देखील हेच दिसून आलं आहे ”

“उस्मानाबाद जिल्ह्यातून आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार केली आहे. आता जसं जिल्हा बँकेत झालं, तसं छुप्या मार्गाने करतील. जिल्हा परिषद निवडणुका आहे, नंतर पंचायत समित्या, नगर पंचायती या ठिकाणी त्यांचा अजेंडा आहे. जो माणूस ताकदीने काम करत असेल, तर त्याच्या पायात खोडा कसा घालायचा. शिवसेनेला मागे कसं खेचायचं हा त्यांचा छुपा अजेंडा आहे. ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे, त्या त्या ठिकाणी हे आपल्यावरच अस्त्र चालवायला लागले आहेत. तुम्ही हातात हात घालून एकत्र बसत आहात, तर आम्हाला टार्गेट नका ना करू. समोर शत्रू तुम्हाला दिसतोय ना, तो स्टेजवर बोलण्यापुरता शत्रू आहे का? आतमधून तुमची मिलीभगत आहे का? शिवसेनेचं सर्वकाही समोर असतं. छातीत वार करणारी ही संघटना आहे”, असं तानाजी सावंत म्हणाले.

“ही सत्ता तुम्ही स्वप्नात तर पहिली होती का ? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली, तुम्ही त्यावरच अन्याय करता. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये असे ठरलेलं असताना का असं होतं? आमच्या नादीला लागू नाका, तुम्ही शंभर मारले आणि आमचा एकच दणकट बसलं की आईचे दूध आठवेल. मागील अडीच वर्षात केवळ अपमान होणार असेल तर साहेबांनी विचार करायला हवा”

Share This News

Related Post

#CRIME : मंत्र तंत्र म्हणून हातावर कापूर जाळायचा आणि पीडित विद्यार्थ्याला ‘तांत्रिक शरीरसंबंध’ करायला भाग पाडायचा; मुंबईतील उच्चशिक्षित दांपत्याचा विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार

Posted by - February 13, 2023 0
मुंबई : मुंबईतील आयआयटीच्या एका विद्यार्थ्यासोबत एक भयानक प्रकार घडला आह. एका समलैंगिक ॲपच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर उच्चशिक्षित दांपत्याने या…

स्वतःचा जीव धोक्यात घालून चिमुकलीला वाचवणारा हिरो, पाहा थरारक व्हिडिओ

Posted by - May 14, 2022 0
नवी दिल्ली- अनेकवेळा लोक आपला जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवताना दिसतात. अशा घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना…
Raj Thackeray birthday

वाढदिवस साजरा करण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचलेल्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी चांगलेच सुनावले; नेमके काय घडले?

Posted by - June 14, 2023 0
मुंबई : आज मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा वाढदिवस आहे. आज राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचा वाढदिवस…
missing girls

Missing Girls : धक्कादायक! राज्यात रोज सरासरी ‘इतक्या’ मुली होतायत गायब; आकडेवारी आली समोर

Posted by - May 8, 2023 0
पुणे : महाराष्ट्रातून मुलींच्या बाबतीत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये राज्यात मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकट्या…
Balu-Dhanorkar

धानोरकरांची तीन दिवसात प्रकृती कशी बिघडली? डॉक्टर मित्राने सांगितले नेमके कारण

Posted by - May 31, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूरचे (Chnadrapur) काँग्रेस (Congress) खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या पार्थिवावर आज सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *