पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात ज्या निकालाची सगळ्यात जास्त चर्चा झाली होती. त्याच निकालाच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झाली आहे. अर्थात अल्पवयीन कारचालक वेदांत अग्रवाल याने 300 शब्दांचा निबंध लिहिला आहे. त्याचबरोबर तो वाहतुकीचे नियम समजून घेण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांबरोबर ट्रॅफिकचे निराकरण करणार आहे.
बिल्डर विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत येरवडा, कल्याणी नगर परिसरात दुचाकीस्वार एका तरुण आणि तरुणीला जोरदार धडक दिली. या धडकेत या दोघांचा निष्पाप बळी गेला. मात्र हा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्यावर बाल न्याय मंडळात खटला चालवण्यात आला होता. यात त्याला केवळ 15 तासांमध्ये जामीन मिळाला होता. त्याचबरोबर या मुलाने शिक्षा म्हणून 300 शब्दांचा निबंध लिहावा. तसेच वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सोबत काम करावे. व्यसनाधीनता सोडवण्यासाठी समुपदेशन घ्यावे, अशा अटींवर हा जामीन देण्यात आला होता. ज्याची चर्चा देशभर झाली. बाल न्याय मंडळाच्या या अटींवर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर या मुलावर सज्ञान म्हणून खटला चालवण्यात यावा, अशी मागणी कोणी पोलिसांकडून करण्यात आली होती. बाल न्याय मंडळाच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने निर्णय देताना बाल न्याय मंडळाची शिक्षा कायम ठेवत पुढील कारवाईचे निर्देश दिले होते.
याच निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसून येत आहे, कारण अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल यांने 300 शब्दांचा निबंध लिहून बाल न्याय मंडळापुढे सादर केला आहे. तसेच समुपदेशन आणि वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सोबत काम करण्यासाठीची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे, अशीही माहिती समोर आली आहे. वेदांत अग्रवाल याला बाल सुधार गृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर नुकतेच काही दिवसांपूर्वी त्याची सुटका करत त्याचा ताबा त्याच्या आत्याला देण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणात सध्या वेदांत अग्रवाल चे आई वडील कोठडी आहे.