Maharashtra Weather Update

Weather Update : पुणे जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

3558 0

पुणे : भारतीय हवामान विभागाने (Weather Update) पुणे आणि महाराष्ट्रातील इतर अनेक जिल्ह्यांसाठी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळ येण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या पुण्यातील आकाश ढगाळ असून तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. आर्द्रता पातळी गडगडाटी ढग तयार होण्यास अनुकूल आहे. स्थानिक अस्थिरतेचा धोका वाढून गडगडाटी वादळे, विशेषतः संध्याकाळच्या वेळी अधिक जाणवणार आहे. चंद्रपूर, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली आणि सोलापूरसह इतर जिल्ह्यांमध्ये गडगडाटाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 42 ते 44 पर्यंत तापमान असणार आहे. यासोबतच IMD ने महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्ये चेतावणी दिली आहे. कारण यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जवळपास 122 वर्षांतील सर्वात जास्त उन्हाची नोंद झाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Elections : प्रकाश आंबेडकर यांना अमरावतीमध्ये मोठा धक्का !

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!