LokSabha

Loksabha : मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भाजपच्या ‘या’ उमेदवाराचं निधन

377 0

लखनऊ : वृत्तसंस्था – लोकसभा (Loksabha) निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान पार पडलं. आता 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या दरम्यान राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये भाजपच्या एका उमेदवाराचं मतदानाच्या दुसऱ्या दिवशी निधन झालं.

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कुंवर सिंह सर्वेश कुमार सिंह यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये आपला अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांना गळ्याला त्रास होत होता आणि त्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. ते 72 वर्षांचे होते.

कुंवर सर्वेश यांना भाजपने 2014 मध्ये मुरादाबादमधून तिकीट दिलं होतं. तेव्हा जिंकले पण 2019 मध्ये सपाच्या उमेदवाराकडून पराभूत झाले होते. भाजपने पुन्हा एकदा कुंवर सर्वेश यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवार केलं होतं. त्यांच्या विरोधात समाजवादी पार्टीचा उमेदवार होता. कुंवर सर्वेश हे मुरादाबाद जिल्ह्याच्या ठाकुरद्वारा विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा आमदार होते. त्यांचे वडील रामपाल सिंह 1984 मध्ये अमरोहा इथून काँग्रेसचे खासदार होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : पुणे जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Lok Sabha Elections : प्रकाश आंबेडकर यांना अमरावतीमध्ये मोठा धक्का !

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!