‘कमळ’ फुललं, ‘झाडू’ फिरला, सायकल ‘पंक्चर’, हात’ मोडला…(संपादकीय)

656 0

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चारही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा भाजपाची कमळं फुलली तर पंजाबमध्ये ‘आप’चा झाडू फिरला. विशेष म्हणजे या पाचही राज्यांतील एकूण 690 जागांपैकी 635 ठिकाणी काँग्रेसचा हात मोडला. उत्तर प्रदेशात सपाची सायकल पुन्हा एकदा ‘पंक्चर’ झाली, बसपाचा ‘हत्ती’ गाळात रुतला तर शिवसेना-राष्ट्रवादीवर उत्तर प्रदेश-गोव्यात डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली.

भाजपाची चार बोटं तुपात…

पाच राज्यांतील एकूण 690 जागांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे 356 ठिकाणी कमळं फुलवत भाजपानं जबरदस्त कामगिरी केलीये. एक पंजाब वगळता भाजपाची चारही बोटं तुपात आहेत. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातील विजयातून पुढं जातो, असं मानलं जातं. याचाच संदर्भ देत उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील भाजपचा ऐतिहासिक विजय म्हणजे 2024 मधील आगामी लोकसभा निवडणुकीतील निकालाची चुणूक असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. उत्तर प्रदेशातील 2017 च्या विधानसभा निकालानं 2019 मधील लोकसभा निवडणुकीचा निकाल निश्चित केला होता आणि आता 2022 च्या निकालानं 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शिक्कामोर्तब केलंय. 2024 ची सार्वत्रिकनिवडणूक जिंकल्यास भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करू शकेल, हे आता स्पष्ट दिसू लागलंय.

‘आप’ कमाई…

दिल्ली दोनदा सर केल्यानंतर ‘आप’नं पंजाबचा गडही जिंकला आणि ‘हम भी है रेस मैं’ असं म्हणत भविष्यात साऱ्या देशात झाडू फिरवू, असा गर्भित इशारा दिला. पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू त्रिफळाचीत, चरणजीतसिंग चन्नी दोन्ही मैदानात पराभूततर प्रकाशसिंग बादल, कॅप्टन अमरिंदरसिंग यांसारख्या दिग्गजांना धूळ चारत ‘आप’नं बाजी मारली. 117 पैकी तब्बल 92 जागांची ‘झाडू’न सफाई करत ‘आप’ कमाई दाखवून दिली.

काँग्रेसचं ‘हात’ दाखवून अवलक्षण…

‘आप’नं काँग्रेसच्या ‘हाता’तील पंजाबही हिसकावून घेतल्यानं देशातील 28 घटक राज्यांपैकी काँग्रेस आता केवळ महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व पुड्डुचेरी या 05 राज्यांपुरती नावाला उरलीये. ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसनं तर काँग्रेसला आपल्या पक्षात विलीन होण्याची ऑफर देत हिणवलं आहे तर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी, ‘काँग्रेसला आपलं नशीब बदलण्याची इच्छा असेल तर आता ते बदल टाळू शकत नाहीत,’ असं म्हणत थेट नेतृत्व बदलाबाबत भाष्य केलंय.

शिवसेना-राष्ट्रवादीबद्दल न बोललेलंच बरं !

उत्तर प्रदेशात सपाच्या सायकलवर बसलेली राष्ट्रवादी सायकलच ‘पंक्चर’ झाल्यानं तोंडावर आपटली तर स्वबळावर लढताना शिवसेनेनं सोडलेले बाण निशाणा साधण्याआधीच मोडून पडले.
गोव्यात तर सेना-राष्ट्रवादीला डिपॉझिटही टिकवता आलं नाही. त्यामुळं शिवसेना-राष्ट्रवादीच्या ‘अतुलनीय’ कामगिरीबद्दल न बोललेलंच बरं !

– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी

Share This News

Related Post

sharad pawar

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार; शरद पवारांची मोठी घोषणा

Posted by - May 2, 2023 0
मुंबई: राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा शरद पवार यांनी केले असून लोक माझे सांगाती पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना…

विधानसभेत अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटाचा घेतला समाचार

Posted by - July 3, 2022 0
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांनी निवड झाली आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या 164 आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान केलं.…

TOP NEWS SPECIAL REPORT : हार्दिक पटेलांना भाजपची उमेदवारी; कसा आहे हार्दिक पटेल यांचा राजकीय प्रवास

Posted by - November 11, 2022 0
कधीकाळी भाजपच्या प्रमुख टीकाकारांपैकी एक असणारे हार्दिक पटेल यांना भाजपानं वीरमगाम मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा हार्दिक…

गंगाधाम चौक येथील आनंदनगर वसाहतीतील झोपडपट्टी पाडण्यासाठी भाजपच्या आमदार आणि नगरसेवकांची बिहार स्टाईल गुंडगिरी – प्रशांत जगताप

Posted by - September 3, 2022 0
पुणे : गंगाधाम चौक येथे आनंदनगर वसाहतीतील झोपडपट्टी पाडण्यासाठी भाजपचे आमदार व नगरसेवकांनी धाक – दडपशाही केल्याचा प्रसंग दोन दिवसांपासून…
Aurangabad Crime

Aurangabad Crime : औरंगाबाद हादरलं ! गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळीने स्वतःच्याच लेकराचा घेतला जीव

Posted by - August 28, 2023 0
औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad Crime) जिल्ह्यातील गंगापूर शहरात मन सुन्न करुन टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये (Aurangabad Crime) खासगी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *