मुंबई : राज्याच्या राजकारणात 2019 आणि त्यानंतर मोठ्या घडामोडी झाल्या. त्यामुळे राज्याचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले. यादरम्यानचा अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी कोणीही विसरू शकणार नाही. या शपथविधीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्या सगळ्या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार असल्याचे सुनील तटकरे म्हणाले आहेत.
काय म्हणाले सुनील तटकरे?
2014 मध्ये राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले होते. त्या काळात शरद पवारांसह आम्ही सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी अमित शाह यांच्याशी चर्चा केली होती. मात्र शिवसेना बाहेर पडली पाहिजे, अशी आमची अट होती. त्यावर अमित शाहांनी त्यास स्पष्टपणे नकार दिला. ही युती बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आदी दिग्गज नेत्यांनी तयारी केली आहे. त्यामुळे ती आम्ही तोडणार नाही. ठाकरे आतच राहतील, असे ठामपणे सांगितले.
राज्यात 2019 ची निवडणूक झाल्यानंतर महिनाभर सरकार स्थापन होत नसल्याने आमची एन्ट्री झाली. त्यावेळी एकीकडे शिवसेना आणि भाजपसोबत चर्चा सुरू होती. तर दुसरीकडे काँग्रेसला सोबत घेण्यासाठीही पर्यत्न सुरू होते. सत्तेत जाण्यासाठी मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये काँग्रेससोबत बैठक झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे राज्यातील नेते उपस्थित होते. त्यावेळी काँग्रेसने शरद पवारांच्या विश्वासार्हतेबाबत शंका उपस्थित केल्या. यामुळे आमच्या मनाला वेदना झाल्या होत्या. यातूनच अजित पवारांनी देवेंद्र फडवीस यांच्यासोबत शपथ घेतली. आणि हा पहाटेचा नसून सकाळी आठ वाजता शपथविधी झाला, असेही तटकरेंनी सांगितले. त्यामुळे आता सुनील तटकरेंच्या वक्तव्यावर काँग्रेस काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे थरार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Vidhanparishad Election : शिक्षक आणि पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली
Pune Loksabha : पुण्याच्या मतदानाची अंतिम आकडेवारी आली समोर
Nashik Accident : ओव्हरटेक करणे आले अंगलट! ST बसच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बुधवारी मुंबईत होणार रोड शो
Manoj Jarange Patil : निवडणूक संपण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
Pune Loksabha : पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल
Beed News : मतदान केंद्राबाहेर गोंधळ, उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा तरीही विक्रमी मतदान!
Mumbai Hoarding Collapse : घाटकोपरमध्ये कोसळलेल्या ‘त्या’ होर्डिगबाबत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर
Weather Update : पुढील 2 दिवसांत पुण्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा