Ahmadnagar Murder

वाद करू नका म्हणणाऱ्या मेव्हणीचाच ‘कार्यक्रम’

844 0

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmadnagar) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भांडण सोडवायला गेलेल्या महिलेची तिच्या मेव्हण्यानेच हत्या (Murder) केली आहे. सुशाला राजेंद्र किर्तने (Sushala Rajendra Kirtane) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर अन्य चौघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या हत्येप्रकरणी शहादेव रामकिसन धायतडक, शुभम शहादेव धायतडक, रणजीत आजिनाथ धायतडक, अक्षय सखाराम धायतडक, संदीप बाळासाहेब शिरसाट, सोमनाथ गणपत घुले यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींमधील शहादेव धायतडक आणि शुभम धायतडक यांना पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मृत सुशाला किर्तने यांचा भाऊ बाळासाहेब शिरसाट याचा सोमवारी बडे वाडी या ठिकाणी दहाव्याचा कार्यक्रम होता. या ठिकाणी सुशाला यांचा शहादेव धायतडक यांच्यासोबत वाद झाला होता. शहादेव धायतडक हा सुशाला यांचा मेव्हणा आहे. दोघा मेव्हण्यांची भांडणे झाल्यानंतर बाळासाहेब हा सुशाला यांच्याकडे किर्तनवाडीला आला होता. सुशाला यांच्या मुलाचे रविवारी लग्न झाले होते. लग्नानंतरचा रीतिरिवाज असल्याने बाळासाहेब हे बहिणीकडे आले होते.

यादरम्यान बाळासाहेब यांच्या मागे त्यांचा मेव्हणा शहादेव धायतडक, त्याचा मुलगा शुभम धायतडक आणि अन्य चौघेजण हत्यार घेऊन आले. यावेळी त्या ठिकाणी मोठा वाद झाला. राजेंद्र किर्तने आणि सुशाला किर्तने यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने शुभमने सुशाला यांच्या डोक्यात दांडक्याने मारहाण केली. यानंतर सुशाला या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Share This News

Related Post

Weather Update

Weather Update : विदर्भात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला इशारा

Posted by - April 29, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रावर अजूनही अवकाळी पावसाचे (Weather Update) ढग कायम आहेत. आज आणि उद्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली…

मंत्रिमंडळ बैठक : राज्यात ‘अमृत 2.0’ अभियान राबविणार

Posted by - July 14, 2022 0
मुंबई : राज्यामध्ये केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…
Harshavardhan Jadhav

Harshvardhan Jadhav : …वाचलो तर पुन्हा भेटू; हर्षवर्धन जाधव यांचा Video आला समोर

Posted by - July 24, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांना दिल्लीत हृदयविकाराचा झटका आला. केंद्रीय मंत्री नितीन…

Decision of Cabinet meeting : ‘या’ 3 नवीन समाजकार्य महाविद्यालयांना मान्यता

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : राज्यात 3 नवीन समाजकार्य महाविद्यालयांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.…

महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता 25 लाख रुपयांचा ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

Posted by - January 31, 2023 0
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *