Gondia News

Gondia News : आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू

258 0

गोंदिया : गोंदियामधून (Gondia News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आपल्या आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या एका युवकाला दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला आहे. या तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजेगाव येथील बाघ नदीवर ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
भूपेंद्र भरत बागडे (वय 20) असं मृत तरुणाचं नाव आहे. तो गोंदियातील खमारी येथील रहिवासी होता. खमारी येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने 30 जानेवारीला गावातीलच मंजू लक्ष्मीनारायण गायधने यांचा मृत्यू झाला होता.मंजू ह्या भुपेंद्रच्या आत्या होत्या. त्यामुळे भुपेंद्रच्या घरातील लोक त्यांच्या पिंडदानासाठी घरून खाजगी वाहनाने निघाले होते. त्यांच्यासोबत भुपेंद्रही गेला होता. पिंडदान करण्यासाठी गेलेले काही लोक आंघोळ करण्यासाठी बाघनदीच्या पाण्यात उतरले.

तर भूपेंद्र हा दगडावर बसून होता. परंतु दगडावर उभा असताना अचानक त्याचा तोल गेला आणि त्याच संतुलन बिघडलं आणि तो नदीत कोसळला. यानंतर नदीच्या डोहात बुडून त्याचा मृत्यू झाला. यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग पथकाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे भुपेंद्रच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

RBI MPC Meet : RBI चं पतधोरण जाहीर

Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का ! बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम

EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

Share This News

Related Post

धर्माबाबत असलेल्या भावनांचं प्रदर्शन नको – शरद पवार

Posted by - April 25, 2022 0
राष्ट्रपती राजवट लावण्याच्या टोकापर्यंत कुणीही जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच प्रत्येकानं आपल्या धार्मिक भावना स्वतःपर्यंत मर्यादित ठेवाव्यात. धर्माबद्दल असलेल्या…

मध्यप्रदेश ते पुणे, पिस्तूल तस्करांचा सुळसुळाट; पोलिसांच्या धडक कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त 

Posted by - July 12, 2024 0
पुण्यात केल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत असल्यामुळे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस ठोस पावले उचलताना दिसत आहेत. त्याचं अनुषंगाने पुणे गुन्हे शाखेच्या…
Shravan Giri Pass Away

Shravan Giri Pass Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध निवेदक प्राध्यापक श्रावण गिरी यांचं निधन

Posted by - September 4, 2023 0
बीड : ज्येष्ठ साहित्यिक आणि निवेदक असलेले प्राध्यापक श्रावण गिरी यांचे अपघाती निधन (Shravan Giri Pass Away) झाले आहे. बीडमध्ये…
Car Accident News

Car Accident News : भरधाव कारची कंटेनरला धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू

Posted by - January 28, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : राज्यात अपघाताचे प्रमाण (Car Accident News) काही थांबायचे नाव घेईना. जालना रोडवरील रस्त्यावर पोलिसांच्या गाडीला भरधाव वेगात…

फिल्मी स्टाईल पळापळी : रस्त्यावर झाली वाहतूक कोंडी; नवरदेवाने काढला पळ

Posted by - March 10, 2023 0
बंगळुरू : बंगळुरूमध्ये एक विचित्र घटना घडली आहे, की ज्या घटनेवर हसावं की दुःख व्यक्त करावं असाच प्रश्न पडेल. तर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *