Dhule Murder

धुळे हादरलं ! राजकीय वादातून कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या

1362 0

धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये धुळे तालुक्यातील उभंड- पिंपरखेड येथे एका राजकीय कार्यकर्त्याची गोळी झाडून तसेच चाकूने गळा चिरुन निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही घटना काल रात्री 9 वाजता घडली आहे. या हत्याकांडामुळे धुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

काय घडले नेमके?
धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या मिलिंद सोसायटी येथे राहणारे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष यशवंत बागुल (Yashwant Bagul) हे त्यांच्या शेतीच्या कामासाठी धुळे तालुक्यातील उभंड या ठिकाणी गेले होते. शेतातील डाळिंबाच्या झाडांना बांबू लावण्यासाठी आणि मजूर शोधण्यासाठी त्यांच्या मामाचा मुलगा व यशवंत बागुल हे शेजारी असलेल्या पिंपरखेड या गावी गेले. त्या ठिकाणाहून परतत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला.

यामध्ये एका आरोपीने बंदुकीतून गोळी झाडली तर दुसऱ्या आरोपीने चाकूने छातीवर व गळ्यावर वार करत यशवंत बागुल यांची निर्घृणपणे हत्या केली. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. यासंदर्भात यशवंत बागुल यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात (Dhule Taluka Police) अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

Hingoli News

Hingoli News : दोघां भावांच्या मृत्यूने हिंगोली हळहळलं ! जिवंतपणी हातात हात घालून फिरले; मरतानादेखील एकमेकांची साथ नाही सोडली

Posted by - October 22, 2023 0
हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. कळमनुरी तालुक्यामध्ये असलेल्या शेवाळा या ठिकाणी 5…

पद्मश्री शीतल महाजनचे 5 हजार फुटावरून स्कायडायविंग

Posted by - March 9, 2022 0
जागतिक महिला दिनानिमित्त स्कायडायव्हर पद्मश्री शीतल महाजनने हडपसरच्या पॅराग्लायडिंग सेंटरमधून पॅरामोटर्सच्या साह्याने 5 हजार फुटावरून रात्रीच्या अंधारात स्कायडायव्हिंक केलं. प्रसिद्ध…

युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय मायदेशी सुखरूप परतले

Posted by - February 24, 2022 0
नवी दिल्ली- रशिया युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. अशा युद्ध परिस्थितीमध्ये युक्रेनमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकलेले आहेत. त्यामुळे या नागरिकांना…

राज्यभरातील जिल्हा वार्षिक आराखड्यांना स्थगिती; शिवतारेंच्या मागणीनंतर सरकारकडून तातडीने परिपत्रक 

Posted by - July 4, 2022 0
पुणे जिल्ह्यात मागील पालकमंत्र्यांनी सरकार कोसळण्याच्या आधी घाईघाईत मंजूर केलेल्या जिल्हा वार्षिक आराखड्यामध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यांवर निधीची खैरात करून शिवसेना, काँग्रेस…

#PUNE : ससूनच्या समाजसेवा अधिक्षक विभाग प्रमुखपदी डॉ. शंकर मुगावे यांची नियुक्ती

Posted by - February 28, 2023 0
पुणे : ससून सर्वो पचार रूग्णालय पुणे येथील समाजसेवा अधिक्षक विभागाचे विभागप्रमुख म्हणून डॉ. शंकर मुगावे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *