मुंबई : जर तुम्ही चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत येणाऱ्या ईपीएफओमध्ये (EPFO) पर्सनल असिस्टंट पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. चला तर मग या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर आढावा जाणून घेऊया…
कोणत्या पदासाठी होत आहे भरती?
पर्सनल असिस्टंटच्या एकूण 323 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी नोंदणी प्रक्रिया 7 मार्चपासून सुरु होणार आहे तर 27 मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. EPFO पर्सनल असिस्टंट असे या परीक्षेचे नाव आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ही परीक्षा घेतली जाणार आहे.
3 टप्प्यांमध्ये घेतली जाणार परीक्षा
ही परीक्षा 3 टप्प्यांमध्ये होणार आहे. सर्वात आधी लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांची कागदपत्र तपासणी केली जाईल. तर अंतिम टप्प्यात वैद्यकीय चाचणी केली जाईल.
कसा कराल अर्ज ?
EPFO पर्सनल असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsconline.nic.inवर जा. वेबसाइटवर दिलेल्या ‘ऑनलाइन अर्ज करा’ या लिंकवर क्लिक करा. ऑनलाइन अर्ज भरा. मागितलेले कागदपत्र अपलोड करा. अर्ज शुल्क भरा. यानंतर अर्ज भरल्याचा फॉर्म स्वतःकडे ठेवावा.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Satara Accident : कास पठाराहून साताऱ्याकडे जाताना कारचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू
Shahapur-Murbad Highway : शहापूर-मुरबाड महामार्गावर भरधाव टेम्पोनं 2 जणांना उडवलं
Pune News : पुरंदर मध्ये कांदा, लसणाच्या शेतात आढळली अफूची शेती
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी
IPL 2024 : ‘सनरायझर्स’च्या कर्णधारपदी ‘या’ खेळाडूची वर्णी
Rinku Rajguru : सैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की; Video आला समोर
Pune Traffic Diversion : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उद्यापासून पुण्यात अवजड वाहनांना बंदी
Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या 4 जणांचा मृत्यू
Road Accident : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू