Dhanurasana

Dhanurasana : धनुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

475 0

धनुरासनाला धनुषासन किंवा धनुष्य आसन (Bow Pose) असेही म्हटले जाते. हे आसन करताना शरीराचा धनुष्यासारखा आकार तयार होतो. धनुरासन हे हठ योगाच्या 12 मूलभूत आसनांपैकी एक मानले जाते. हे आसन योग शास्त्रामध्ये पाठ स्ट्रेच करण्यासाठी किंवा तणाव तयार करण्यासाठी वर्णन केलेल्या तीन प्रमुख आसनांपैकी एक आहे. या आसनाचा सराव केल्याने पाठीला चांगला ताण येतो. या आसनाच्या सरावाने कंबरेतील लवचिकता वाढते आणि कंबर मजबूत होते.

धनुरासन करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्या
धनुरासनाचा सराव करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही जाणून घ्यायला हव्यात. धनुरासनाचा सराव करण्यापूर्वी तुमचे पोट रिकामे असायला हवे. हे आसन तुम्ही सकाळी शौचाला जाऊन आल्यानंतरच करायला हवे. हे आसन करण्यापूर्वी कमीतकमी 4 ते 6 तासांपूर्वीच तुम्ही जेवण करुन घ्या. यामध्ये मग पोटातील अन्न पचायला पर्यायी वेळ मिळतो. यामुळे सरावासाठी लागणारी ऊर्जाही सहज मिळवता येऊ शकते.

हे आसन करण्याची सर्वात चांगली वेळ ही सकाळची आहे.  परंतु, काही कारणांमुळे जर तुम्हाला सकाळी हे आसन करता आले नाही तर सायंकाळच्या वेळेत तुम्ही या आसनाचा सराव करु शकता.

धनुरासन कसे करायचे ?

1. योगा मॅटवर पोटाच्या आधारे झोपा, पाय जवळ ठेवा आणि हात पायाजवळ ठेवा.

2. हळूवारपणे गुडघे वाकवा आणि हातांनी दोन्ही पायांच्या घोट्यांना धरा.

3. नाकाने श्वास आत घ्या आणि शरीराला आतल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करा आणि छाती वर करा आणि मांड्या जमिनीवरून उचला. हातांनी पाय ओढा.

4. नंतर समोरच्या बाजूला बघा आणि चेहऱ्यावर गोड स्माईल ठेवा.

5. तुमचे लक्ष श्वासाच्या वेगावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. शरीराची स्थिती धनुष्यासारखी stretched पाहिजे. हात धनुष्याच्या ताराप्रमाणे काम करतील.

6. हे तेव्हापर्यंत करा की जेव्हा तुम्ही हे आसन सहजपणे करु शकाल. दीर्घ आणि मोठा श्वास घ्या.

7. जवळपास 15-20 सेकंदानंतर श्वास सोडा आणि पुन्हा तुमच्या सामान्य स्थितीमध्ये या.

धनुरासन करण्याचे फायदे

1. धनुरासनाचा नियमित सराव केल्याने तुम्हाला याचे जबरदस्त फायदे मिळू शकतात.

2. धनुरासनाचा सराव केल्याने पाठ मजबूत राहते आणि पोटाच्य खालच्या भागातील मांसपेशी मजबूत होतात.

3. या आसनाच्या सरावाने नपुंसकता दूर करण्यात मदत मिळू शकते.

4. धनुरासन केल्याने मान, छाती आणि खांदे रुंद होतात.

5. हे आसन रोज केल्याने हात आणि पायांच्या मांसपेशी सुडौल राहतात.

6. हे आसन केल्याने पाठीमध्ये लवचिकता वाढते.

7. धनुरासनाच्या रोजच्या सरावाने मानसिक ताण-तणाव कमी करण्यात मदत मिळते.

8. किडनीच्या संक्रमणापासून सुटका करुन घेण्यात धनुरासन खूप मदत करते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!