पुणे : पुण्यातील येरवड्यात कोयता हातात घेत आरोपींकडून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. येरवड्यातील गांधी नगर मध्ये रविवारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पुण्यात कोयता गँग पुन्हा ॲक्टिव्ह; 5 जणांना अटक (Video) pic.twitter.com/Ov9j8LI76A
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 6, 2023
किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने पाठलाग करत कोयता व काठीने मारहाण करून फिर्यादीला जखमी केले आहे. या प्रकरणी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे.