कर्नाटक : वृत्तसंस्था – पुण्यामध्ये पोर्शे कारने अपघाताचे पडसाद देशभरात उमटत आहे. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ कर्नाटकमधून (Karnatak Video) समोर आला आहे. ही संपूर्ण गॅंगवॉरची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये एका टोळक्याने एकमेकांवर तलवारीने वार केले. एवढंच नाहीतर एका जणाला कारखाली चिरडलं. कर्नाटकच्या उडपी भागातील कुंजीबेट्टू परिसरात ही घटना घडली आहे.
ಕರ್ನಾಟಕ ಮಾಡೆಲ್!
ಗ್ಯಾಂಗ್ ವಾರ್ಗಳು, ಯುವತಿಯರ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ, ಹಲ್ಲೆ, ಹತ್ಯೆ, ಬಾಂಬ್ ಬ್ಲಾಸ್ಟ್ಗಳು, ಗಾಂಜಾ, ಅಫೀಮು, ರೇವ್ ಪಾರ್ಟಿಗಳು, ಪಾಕೈಸ್ತಾನ್ ಜಿಂದಾಬಾದ್ ಘೋಷಣೆಗಳು ಸೇರಿ ಇತ್ಯಾದಿಗಳು @INCKarnataka ಸರ್ಕಾರದ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಕಾಮನ್ ಆಗಿದೆ.
ಉಗ್ರರು, ಮತಾಂಧರು, ಪುಂಡರು, ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ರೌಡಿಗಳಿಗೆ @siddaramaiah… pic.twitter.com/s0SVgbBYW2
— BJP Karnataka (@BJP4Karnataka) May 25, 2024
काय घडले नेमके?
या व्हिडीओमध्ये दोन वाहनांमधून आलेल्या काही तरुणांच्या टोळक्यांनी एकमेकांवर हल्ले केले असून एकमेकांवर वाहनं चढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. उडपी-मणिपाल राष्ट्रीय महामार्गावरील या घटनेचा व्हिडीओ तिथल्या एका रहिवाशाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत दोन जणांना अटक केली असून गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या तलवारी, सुरे, एक स्विफ्ट कार, दोन दुचाकी आणि इतर शस्त्र जप्त करण्यात आली आहे.
ही गँगवॉरची घटना उडप्पी आणि मणिपाल दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर झाली आहे. गुंडांनी आपली कार हायवेवर उभी केली आणि दुसऱ्या टोळीच्या गुंडावर हल्ला केला. त्यामुळे आता कर्नाटकमधील कायदा सुव्यवस्थेबद्दलचा प्रश्न समोर आला आहे. भाजपने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Bacchu Kadu : ‘रवी राणांमुळे लोकसभेत नवनीत राणा पडणार’ बच्चू कडू यांचे मोठे वक्तव्य
Sikander Bharti : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिकंदर भारती यांचं निधन
Surendra Kumar Agarwal: पुणे अपघात प्रकरण ! सुरेंद्र अग्रवाल यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी
Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी ‘त्या’ दोघांविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Pune Porsche Accident : अग्रवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर; पोलिसांनी केला याचा खुलासा
Gondia News : दोन जिवलग मित्र ! पण ‘ती’ एक चूक अन् मित्रानेच घेतला मित्राचा जीव
Legislative Council Elections : विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने ‘या’ 2 नेत्यांना दिली उमेदवारी
Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक