Gondia News

Gondia News : दोन जिवलग मित्र ! पण ‘ती’ एक चूक अन् मित्रानेच घेतला मित्राचा जीव

383 0

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यतून (Gondia News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपली एक चूक आपल्याला किती महागात पडू शकते याचा प्रत्यय तुम्हाला येईल. दारूच्या नशेत केलेली शिवीगाळ एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. या शिवीगाळीमुळे जिवलग मित्रानेच मित्राचा खून केला आहे. ही घटना गोंदिया शहरातील छोटा गोंदिया परिसरातील शास्त्री वॉर्ड या ठिकाणी घडली आहे. राहुल दिलीप बिसेन (22, रा. शास्त्री वॉर्ड, छोटा गोंदिया) असे मृत तरुणाचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
सोनू सुनील भोयर (23, रा. जितेश चौक, छोटा गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे. मागील अनेक दिवसांपासून मित्र म्हणून वावरणारे सोनू सुनील भोयर आणि राहुल दिलीप बिसेन हे दोघेही घटनेच्या दिवशी छोटा गोंदिया येथील लग्न समारंभात गेले होते. यावेळी दोघांनीही मद्यप्राशन केलं होतं. मित्र असले तरी त्या दोघांची काहीवेळा शाब्दिक चकमक उडायची. या लग्न समारंभातही त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादात राहुल बिसेन याने आरोपी प्रतीक भोयर याला शिवीगाळ केली आणि हीच चूक त्याला महागात पडली.

यानंतर लग्नात शिवीगाळ केली म्हणून रागात प्रतीकने थांब तुला पाहून घेतो, अशी धमकी दिली. यानंतर तो लग्न मंडपाच्या बाहेर निघून गेला. त्याच्या नंतर काही वेळातच राहुल बिसेन हासुद्धा बाहेर गेला आणि पुन्हा त्या दोघांत पुन्हा एकदा खटका उडाला. परिणामी प्रतीक भोयर याने राहुल बिसेनच्या पोटावर, छातीवर आणि शरीरावर धारदार चाकूने वार करून त्याचा खून केला. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलिसांनी आरोपी प्रतीक भोयर याच्याविरुद्ध भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Legislative Council Elections : विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने ‘या’ 2 नेत्यांना दिली उमेदवारी

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Pune Porsche Accident : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! विशाल अग्रवाल प्रकरणात केल्या ‘या’ 4 मोठ्या कारवाया

Share This News

Related Post

#Crime News : कोल्हापुरातील जयंती नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह; हत्या की घातपात, तपास सुरू …

Posted by - January 28, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापुरात आज एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे . कोल्हापुरातील जयंती नाल्यात जलशुद्धीकरण केंद्राजवळ एका महिलेचा…
Manoj Jarange

Manoj Jarange : “सरकार कोसळलं तर आरक्षण…”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले…

Posted by - November 3, 2023 0
मुंबई : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी चालू केलेलं बेमुदत उपोषण गुरुवारी मागे घेतलं. यावेळी त्यांनी सरकारला…
Sangli Crime

पार्टीनंतर पोहायला गेलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 14, 2023 0
सांगली : सांगली पोलीस मुख्यालयातील मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तिम्बती आवळे यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू…

धक्कादायक : पूर्ववैमनस्यातून येरवड्यात दोन सराईत गुन्हेगारांचा खून; एक जण गंभीर जखमी

Posted by - November 12, 2022 0
पुणे : पूर्ववैमनस्यातून येरवड्यामध्ये दोघा सराईत गुन्हेगारांचा तलवार आणि कोयत्याने वार करून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या…
Thane News

Kalwa Hospital : कळवा रुग्णालयात आणखी 4 रुग्णांचा मृत्यू; मृतांमध्ये लहान बाळाचा समावेश

Posted by - August 14, 2023 0
ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कळवा रुग्णालयात (Kalwa Hospital) 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *