Nagpur Accident

Nagpur Accident : पुण्यानंतर नागपूरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना ! मद्यधुंद कारचालकाने तीन महिन्याच्या बाळासह तिघांना उडवले

373 0

नागपूर : पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये झालेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह अपघातानंतर देशभरात चर्चेला उधाण आलं होतं. यादरम्यान नागपूरमध्ये (Nagpur Accident) देखील ड्रंक अँड ड्राईव्हची घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपी मद्यधुंद कारचालकाने काल रात्री तीन महिन्याच्या बाळासह तिघांना उडवले. नागपूर शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ हा अपघात झाला. कारचालक आणि गाडीत बसलेले त्याचे इतर दोन सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते. यावेळी गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

ड्राईव्हर तरुण आणि त्याच्यासोबत गाडीत बसलेले त्याचे इतर दोन सहकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती प्रत्यदर्शींनी दिलीये. या घटनेत पायी जाणारी महिला, पुरुष आणि तीन महिन्याचा चिमुकला जखमी झाला आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातानंतर जमावाने मद्यधुंद तरुणांना चोप दिला अन् ड्राईव्हर तरुणाला बेदम चोप दिलाय. त्यानंतर जमावाने तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. या गाडीत गाडीमध्ये अमली पदार्थ ही सापडले आहेत. सनी चव्हाण, अंशुल ढाले आणि आकाश अशी आरोपींची नावे आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Gondia News : दोन जिवलग मित्र ! पण ‘ती’ एक चूक अन् मित्रानेच घेतला मित्राचा जीव

Legislative Council Elections : विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने ‘या’ 2 नेत्यांना दिली उमेदवारी

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Pune Porsche Accident : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! विशाल अग्रवाल प्रकरणात केल्या ‘या’ 4 मोठ्या कारवाया

Share This News

Related Post

Pune Fight Video

Pune Fight Video : पुणे रेल्वे स्टेशनवर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी

Posted by - August 5, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण (Pune Fight Video) झाला आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील (Pune Fight Video)…
Marathi Sahitya Sammelan

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनासाठी प्रशासन अलर्टमोडवर; प्रशासनातर्फे समन्वय अधिकारी म्हणून प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची नियुक्ती

Posted by - December 26, 2023 0
जळगाव : ९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी,…

महिला मोर्चा कोथरुड मतदार संघातर्फे आयोजीत भव्य महिला मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न

Posted by - March 20, 2022 0
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा, कोथरुड मतदार संघातर्फे आयोजीत भव्य महिला मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा…
Manoj Jarange

Manoj Jarange : जरांगे पाटलांनी सांगितला तोडगा ! 54 लाख कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मग…

Posted by - January 18, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : आज सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये येणार आहे.…
Nitin Desai

Nitin Desai : नितीन देसाईंच्या आत्महत्येबाबत स्थानिक आमदाराने केला ‘हा’ मोठा खुलासा

Posted by - August 2, 2023 0
मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आज सकाळी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *