Bacchu Kadu And Rana

Bacchu Kadu : ‘रवी राणांमुळे लोकसभेत नवनीत राणा पडणार’ बच्चू कडू यांचे मोठे वक्तव्य

480 0

अमरावती : राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असून उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झालं आहे. यादरम्यान राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. आता सध्या सगळीकडे प्रचाराच धुराळा शांत झाला आहे. मात्र अमरावती मतदारसंघ याला अपवाद ठरला आहे. कारण, मतदान झाल्यानंतरही प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद काही कमी होण्याचे नाव घेईना. यादरम्यान बच्चू कडू यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

काय म्हणाले बच्चू कडू ?
सार्वजनिक जीवनात प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे रवी राणांपेक्षा लाख पटीने चांगले आहेत. तर नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर रवी राणांचा असेल. नवनीत राणांच्या पराभवाचे सर्वात मोठे श्रेय ही रवी राणांना जाईल, असेही बच्चू कडू म्हणाले. एकट्या रवी राणामुळे आम्ही निवडणुकीमध्ये उभे राहिलो असं नाही, निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला ह्या स्लोगनला आम्हाला समोर न्यायचं होतं. अमरावती जिल्ह्यामध्ये आमची काय ताकद आहे? आम्ही कशी बाजी पलटवू शकतो, ती अजूनही मतपेटीमध्ये बंद आहे, निकाल आमच्या बाजूने लागेल याची आम्हाला खात्री आहे. आम्ही ही निवडणूक जिंकणार आहे, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

अमरावतीत तिरंगी लढत
नवनीत राणा यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. निवडणूक जिंकल्यानंतर नवनीत राणा यांना भाजपला पाठिंबा दिला. आता यावेळी त्या भाजपच्या तिकीटावर लोकसभेच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिलीय. तर प्रहारकडून दिनेश बूब आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे उमेदवार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sikander Bharti : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिकंदर भारती यांचं निधन

Surendra Kumar Agarwal: पुणे अपघात प्रकरण ! सुरेंद्र अग्रवाल यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी

Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी ‘त्या’ दोघांविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Pune Porsche Accident : अग्रवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर; पोलिसांनी केला याचा खुलासा

Nagpur Accident : पुण्यानंतर नागपूरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना ! मद्यधुंद कारचालकाने तीन महिन्याच्या बाळासह तिघांना उडवले

Gondia News : दोन जिवलग मित्र ! पण ‘ती’ एक चूक अन् मित्रानेच घेतला मित्राचा जीव

Legislative Council Elections : विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने ‘या’ 2 नेत्यांना दिली उमेदवारी

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Pune Porsche Accident : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! विशाल अग्रवाल प्रकरणात केल्या ‘या’ 4 मोठ्या कारवाया

Share This News

Related Post

New Executive of the Thackeray Group

New Executive of the Thackeray Group : ठाकरे गटाची नवी कार्यकारिणी जाहीर; ‘या’ 6 जणांकडे देण्यात आले नेतेपद

Posted by - October 16, 2023 0
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून (New Executive of the Thackeray Group) एक मोठी बातमी समोर आली आहे. पक्षप्रमुख…
Nashik News

Nashik News : गॅस भरताना ओमनी कारचा अचानक झाला स्फोट; चिमुकल्यांसह 10 जण जखमी

Posted by - November 18, 2023 0
नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये मारुती व्हॅन कारमध्ये गॅस भरताना आग लागल्याने मोठी…

नवीन गॅस कनेक्शन महागले ! नवीन कनेक्शनसाठी आता ग्राहकांना मोजावे लागणार एवढे पैसे

Posted by - June 15, 2022 0
मुंबई – पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी १४५० रुपये मोजावे लागत होते.…

पुण्यासह “या” ठिकाणी सरकार सुरू करणार हेरिटेज वॉक – अजित पवार

Posted by - March 11, 2022 0
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री…
Nagpur News

Nagpur News : धक्कादायक ! गुड बाय एव्हरीवन, स्टेटस ठेवून 25 वर्षीय जिम ट्रेनर तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - June 28, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सीताबर्डीच्या तेलीपुरा परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिला जिम ट्रेनरने गळफास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *