Jalgaon Crime

Jalgaon Crime : लग्नघरात शोककळा ! जुन्या वादाच्या रागातून भावी नवरदेव तरुणाची हत्या

686 0

जळगाव : जळगावमधून (Jalgaon Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये अवघ्या 15 दिवसांवर लग्न असलेल्या नवरदेवाची जुन्या वादातून चार ते पाच जणांनी हत्या केली आहे. ही घटना जळगाव शहरातील समता नगर येथे रविवारी दुपारी घडली आहे. अरुण बळीराम सोनवणे (वय 28, रा. समता नगर जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर या घटनेत सोबत त्याचा भाऊ गोकुळ बळीराम सोनवणे आणि आशिष संजय सोनवणे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहे त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी पाच जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
जळगाव शहरातील समता नगर परिसरात जुन्या वादातून अरुण सोनवणे याचा काही तरुणांसोबत वाद झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी समतानगर परिसरातच राहणाऱ्या सोनू अढाळे याने अरुण व त्याचा मित्र आशिष सोनवणे याला बोलावले होत. याच ठिकाणी तयारीत असलेल्या सोनू अढाळे यांच्यासोबत चार जणांनी त्यांच्यावर चॉपर व कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये अरुण सोनवणे यांच्या गळ्यावर, छातीवर पाठीवर, मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. होता. तर या घटनेत अरुण याला वाचवण्याच्या प्रयत्नात विरोध करतांना अरुण सोबत त्याचा मित्र आशिष संजय सोनवणे हा सुध्दा गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला.तसेच जखमी गोकुळ आणि आशिष सोनवणे या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी मयत अरुण याचा भाऊ जखमी गोकुळ सोनवणे याच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात मारेकरी सोनू अढाळे, पप्पू अढाळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड व योध्या ऊर्फ पिंट्या शिरसाठ सर्व रा. समतानगर या पाच जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jalna Firing : खळबळजनक ! जालन्यात भरदिवसा गोळीबार; 1 जणाचा मृत्यू

Pune University : पुणे विद्यापीठात संत ज्ञानेश्वर महाराजांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Article 370 : कलम 370 रद्द निकालाबाबत PM मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली;डॉक्टरांनी दिली ‘ही’ माहिती

Farmer Suicide : धक्कादायक ! बँकेची नोटीस येताच शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

Ajmal Shareef : स्वतःलाच श्रद्धांजली वाहत ‘या’ प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरची आत्महत्या

Sanjay Raut : नवाब मलिक यांच्या बद्दल भूमिका घेतली मग प्रफुल पटेल यांच्या बद्दल का नाही? संजय राऊत यांची सरकारवर जोरदार टीका

Article 370 Verdict : कलम 370 रद्दचा निर्णय कायम, सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय

MNS Protest : मनसैनिक आक्रमक; ‘या’ मागणीसाठी लोणावळ्यात रेल रोको आंदोलन

Winter Season : थंडीचा तडाखा वाढणार; विदर्भासह मुंबईही गारठणार हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Crime News : पुणे हादरलं ! कोयता गँगकडून व्यवसायिकाची हत्या; Video आला समोर

Posted by - September 30, 2023 0
पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात (Pune Crime News) सध्या गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. या ठिकाणी कोयता गँगची सध्या…

साखर उद्योगातील योग्य नियोजन गरजेचे – नितीन गडकरी (व्हिडीओ)

Posted by - June 4, 2022 0
पुणे- साखर उद्योग हा महाराष्ट्राचा मुख्य उद्योग आहे. या उद्योगातील क्षमता लक्षात घेऊन पुढील नियोजन करणे गरजेचे आहे. इथेनॉलचे महत्व…

‘महाराष्ट्राचा सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा हरपला’ मान्यवरांची श्रद्धांजली

Posted by - March 29, 2023 0
पुण्याचे खासदार गिरीश बापट (वय ७२) यांचे निधन झाले. गिरीश बापट यांनी दीनानाथ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट यांच्या…
Nashik Bus Accident

Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी घाटात ST बस दरीत कोसळली; 15 जण जखमी

Posted by - July 12, 2023 0
नाशिक : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज सकाळच्या सुमारास समृद्धी महामार्गावर अपघात (Nashik Bus Accident) झाल्याची घटना ताजी असताना…
bomb-threat

Mumbai Blast Threat Call: मुंबई, पुण्याला उडवण्याची धमकी देणाऱ्या कॉलचे यूपी कनेक्शन समोर

Posted by - June 23, 2023 0
मुंबई : आज सकाळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला सकाळी एक धमकीचा (Mumbai Blast Threat Call) फोन आला. यामध्ये कॉल करणाऱ्याने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *