Ajmal Shareef

Ajmal Shareef : स्वतःलाच श्रद्धांजली वाहत ‘या’ प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरची आत्महत्या

582 0

मुंबई : आजकाल लोकांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. अशीच एक धक्कादायक घटना केरळमधून समोर आली आहे. यामध्ये एका 28 वर्षांच्या प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरने (Ajmal Shareef) आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी अजमलनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून स्वतःसाठीच शोकसंदेश लिहिला. एवढंच नाहीतर त्यानं पोस्टसोबत स्वतःचा एक फोटोही शेअर केला आणि त्यानंतर आत्महत्या केली.

अजमल शरीफ (Ajmal Shareef) असं मृत 28 वर्षीय इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरचं नाव आहे. अजमल केरळमधील अलुवा येथील रहिवासी होता. शुक्रवारी संध्याकाळी साधारणतः साडेसहाच्या सुमारास अजमलचा मृतदेह त्याच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. चांगली नोकरी मिळत नसल्यानं अजमल नैराश्यात होता, असे अजमलच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

अजमलचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. इंस्टाग्रामवर अजमलचे 15 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी अजमलनं इन्स्टाग्रामवर स्वत:साठी शोकसंदेश पोस्ट केला होता. या घटनेमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sanjay Raut : नवाब मलिक यांच्या बद्दल भूमिका घेतली मग प्रफुल पटेल यांच्या बद्दल का नाही? संजय राऊत यांची सरकारवर जोरदार टीका

Article 370 Verdict : कलम 370 रद्दचा निर्णय कायम, सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय

MNS Protest : मनसैनिक आक्रमक; ‘या’ मागणीसाठी लोणावळ्यात रेल रोको आंदोलन

Winter Season : थंडीचा तडाखा वाढणार; विदर्भासह मुंबईही गारठणार हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Thane Crime News : ठाणे हादरलं! भररस्त्यात तरुणाची निर्घृणपणे हत्या

Vishnu Deo Sai : विष्णुदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

Car Accident : संसार फुलण्यापूर्वीच नवदाम्पत्याचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!