दौंड तालुक्यातील खामगाव येथे अज्ञात कारणावरुन दाजीने मेव्हण्याचा कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.
आज शनिवारी (ता. 03) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास खामगाव गावचे हद्दीतील घडामोडी चौकात ही घटना घडली आहे.
सुरज राहुल भुजबळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे.