महत्वाची बातमी ! महाराष्ट्र निर्बंधमुक्त, गुढीपाडवा साजरा करा जल्लोषात

350 0

मुंबई- राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी. कोरोना संदर्भातील सर्व निर्बंध हटवण्यात आले असून यंदा नागरिकांना गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, ईद जल्लोषात साजरी करता येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे यंदा गुढीपाडवा उत्साहात साजरा करता येणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेवर देखील बंदी असणार नाही.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात निर्बंध सुरू आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान याची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर त्यामध्ये शिथिलता आणण्यात आली. आता राज्यातील कोरोना हा नियंत्रणात आल्याने राज्य मंत्रिमंडळाने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे निर्णय ?

– 1 एप्रिलपासून महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध हटतील.
– मार्च 2020 ते 31 मार्च 2022 जवळपास दोन वर्षे लागू असलेले कोरोनाचे निर्बंध संपुष्टात येतील.
– गुढीपाडवा शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती.
– केंद्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती आणि सोसल डिस्टन्सिंग कायम असेल.
– मात्र महाराष्ट्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती नसेल, मास्क लावणे ऐच्छिक असेल.
– हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थामधील उपस्थिवर मर्यादा नाही.
– लग्न किंवा कौटुंबिक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितींवर मर्यादा नाही.

Share This News

Related Post

Gadchiroli News

Gadchiroli News : नदीला पूल नसल्याने मृतदेह खाटेच्या साहाय्याने नेण्याची वेळ

Posted by - October 12, 2023 0
गडचिरोली : आज महाराष्ट्राने बरीच प्रगती केली असली तरी काही ठिकाणी (Gadchiroli News) अजूनदेखील चित्त विदारक चित्र पाहायला मिळत आहे.…
Prakash Ambedkar

Loksabha Elections 2024 : वंचितने मविआच्या बैठकीत केल्या ‘या’ 4 मागण्या

Posted by - February 28, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections 2024) जागा वाटपासंदर्भात महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने…
Result

HSC 12th Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर; पुन्हा एकदा मुलींनीच मारली बाजी

Posted by - May 21, 2024 0
पुणे : बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्याआधी सकाळी अकरा वाजता बोर्डाने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल…
Yavatmal Crime

Yavatmal Crime : यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल

Posted by - December 29, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *