पुणे- पुणे शहरातील एसआरए मधील नवीन गृह प्रकल्पांना अतिरिक्त एफएसआय वाढवून मिळावा अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागणीचा तातडीने विचार करून अतिरिक्त एफएसआय मंजूर केला आहे. त्याबद्दल शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
पुणे शहर हे भौगोलिकदृष्टया राज्यातील १ क्रमांकाचे शहर आहे. या शहराच्या एकुण लोकसंख्येपैकी तब्बल ४२ टक्के लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते. तसेच या शहरात एकूण ५४२ झोपडपट्टया आहेत. सध्या पुणे शहरात सुरू असलेले एसआरए प्रकल्पांमधील झोपडपट्टी वासीयांना मिळणारी २७० चौ. फुटची घरे अपुरी ठरतात. त्यामुळे एसआरए मधील नवीन गृह प्रकल्पांना अतिरिक्त एफएसआय वाढवून मिळावा अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली होती.
अजित पवार यांनी या मागणीचा विचार करून आज, बुधवारी तात्काळ हा विषय मार्गी लावला असून इथून पुढे सुरू होणाऱ्या एसआरए प्रकल्पांमध्ये किमान ३०० चौ. फुटाची घरे देण्याबाबतचा आदेश राज्याच्या गृहनिर्माण विभागाने काढला आहे. या निर्णयामुळे या सर्व नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.