Vishal Agrawal

Pune Accident : विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; ‘हे’ 2 नवीन कलम लावण्यात येणार

633 0

पुणे : रविवारी पुण्यात मोठा अपघात (Pune Accident) घडला होता. अल्पवयीन मुलानं भरधाव पोर्शे कार चालवत दोन दुचाकीस्वारांना चिरडलं. या घटनेत अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. यानंतर आरोपीला लेगच जामीन मिळाल्याने वातावरण तापले होते. यानंतर पोलिसांच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. दरम्यान या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे.

या अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला पोर्शे कार चालवायला दिल्यानं पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. तसेच अल्पवयीन मुलाला दारू दिल्यानं पबमधील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून विशाल अग्रवाल यांच्यासह त्यांनाही अटक करण्यात आली आहे. यानंतर विशाल अग्रवाल याच्यावर आणखी दोन कलमे लावण्यात आली आहेत.

येरवडा पोलिसांनी मूळ अपघाताच्या गुन्ह्यांत पुरावे नष्ट केल्याप्रकरणी कलम 201 वाढवलं आहे. तसेच गुन्हे शाखेकडून विशाल अग्रलवाल यांच्यावर सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी 420 चा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. परिवहन विभागाकडून आलेल्या तक्रारीनंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता विशाल अग्रवालच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञाताकडून हल्ला; रॉडने केली गाडीची तोडफोड

Pune News : पुणे शहर पोलीस आयुक्तांची तातडीने बदली करावी : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

Laila Khan Murder Case : अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट! आरोपी वडिलांना कोर्टाने सुनावली फाशी

Mumbai Crime : पुण्यानंतर मुंबईतदेखील हिट अँड रनची घटना

Medha Kulkarni : ब्लॅक या पब च्या मालकाचे नाव FIR मधून का वगळले? खासदार मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला प्रश्न

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न – अमितेश कुमार

Lifetime Achievement Award : अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Sindhudurga News : मासेमारीसाठी जात असलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू तर 2 जण बेपत्ता

Weather Update : आज कोसळणार मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हायअलर्ट

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Accident News : वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!