Abhishek Ghosalkar

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येच्या दिवशी मॉरिसच्या ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं ? ‘ही’ नवी माहिती आली समोर

914 0

मुंबई : ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरून गेला. मॉरिस नावाच्या गुंडाने फेसबुक लाईव्ह सुरू असताना घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणाचा तपास सुरु असताना नवी माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी रोजी मॉरिसने हत्या केली. घोसाळकरांवर गोळीबार केल्यानंतर मॉरिसने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. पण, त्यावेळी नेमंक काय घडलं हे समोर आलं आहे.

‘ही’ नवी माहिती आली समोर
फेसबुक लाईव्ह सुरू असताना मॉरिसने मोठ्या शिताफीने घोसाळकरांना पुढे बोलण्यास सांगितलं. त्यानंतर मॉरिस आतमध्ये गेला आणि पिस्तुल घेऊन आला. जसे घोसाळकर उभे राहिले त्याने बेछुटपणे गोळीबार सुरू केला. मॉरिसने 5 गोळ्या झाड्या होत्या, 3 गोळ्या घोसाळकरांना लागल्या. घोसाळकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर एक गोळी बंदुकीत उरली होती. मॉरिसने उरलेली एक गोळी घोसाळकर यांच्यासमोरच स्वत:च्या डोक्यात झाडण्याचा प्रयत्न केला होता. पण गन लॉक झाली होती.

3 गोळ्या लागल्यानंतरही घोसाळकरांनी मॉरिसवर झेप घेतली होती. त्याच्या हातातून ती पिस्तुल हिसकावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण, त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला. तोपर्यंत ऑफिसच्या बाहेर उभे असलेल्या घोसाळकरांच्या कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी धाव घेतली. कार्यकर्ते धावत येताना पाहून मॉरिस घाबरला आणि पोटमाळ्यावर पळून गेला. त्यानंतर त्याने पिस्तुल पुन्हा रिलोड केली आणि डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

विशेष म्हणजे, हत्येच्या एक दिवस आधी घोसाळकर आणि मॉरिस हे ऑफिसमध्ये बसले होते. रात्री 11 पर्यंत ते एकत्र होते. ते गेल्यानंतर मॉरिस हा आपल्या मित्रांसोबत रात्री फिरत होता. रात्री सोमनिया बारमधून त्याने एक बिअर विकत घेतली. रात्रभर पित होता. दुसऱ्या दिवशी त्याने घोसाळकरांची हत्या केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jaya Prada : अभिनेत्री जया प्रदांच्या अडचणीत वाढ! ‘या’ तारखेला न्यायालयात हजर करण्याचे दिले आदेश

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 28 वर्षीय तरुणाने पोलिस चौकीत स्वत:ला जाळून घेतले

Dattajirao Gaikwad : भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन

Suicide News : धक्कादायक! कंगनासोबत काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या

Pune News : स्वराज्य सप्ताह आणि शिवजयंती निमित्त दत्ता धनकवडे व आप्पा रेणुसे मित्रपरिवाराकडून भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Ashok Chavan : संजय राऊतांनी अशोक चव्हाणांच्या बाबतीत केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणी आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ ! न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय

Teacher Recruitment : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! 12 वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

Pune News : श्री गणेश जयंतीनिमित्त आज मध्य भागातील वाहतुकीत होणार ‘हे’ बदल

Pune News : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!