Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

203 0

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल काँग्रेसचा हात सोडत पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मीडियासमोर येत त्यांनी मी दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्यांनी आजच भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
28 ऑक्टोबर 1958 या दिवशी अशोक चव्हाण यांचा जन्म मुंबईत झाला. विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर त्यांनी एमबीए केलं. 1985 मध्ये संजय गांधी निराधार योजनेचे नांदेड शहराचे चेअरमन झाले. तिथून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. प्रकाश आंबेडकर यांचा जेव्हा त्यांनी निवडणुकीत पराभव केला तेव्हा अशोक चव्हाण हे अवघ्या 30 वर्षांचे होते. 1987 ते 1989 या कालावधीत ते खासदार होते. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. 1986 ते 1995 या कालावधीत अशोक चव्हाण हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. 1999 मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आणि ते निवडूनली आहे. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीचा आलेख चढता राहिला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग

Share This News

Related Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचीत निर्णय घेणार

Posted by - March 20, 2023 0
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन…
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बंडाचे याअगोदर ‘6’ वेळा केले होते प्रयत्न

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) हे नाव प्रचंड चर्चेत आहे. अजित पवारांनी शिंदे – फडणवीस सरकारला…

पाण्याच्या वाढत्या मागणीनुसार मुळशी टप्पा क्रमांक दोनच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी देण्यात येणार- अजित पवार

Posted by - April 9, 2022 0
तालुक्यातील वाढते नागरिकीकरण त्यानुसार वाढत जाणारी पाण्याची मागणी विचारात घेवून मुळशी टप्पा क्रमांक दोनच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी देण्यात येईल, असे…

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय; गुरे ढोरे रस्त्यावर ने आण करण्यासंदर्भात आता कैदे ऐवजी दंडाची तरतूद

Posted by - January 10, 2023 0
मुंबई : राज्य वेतन सुधारणा समिती ( बक्षी समिती) चा अहवाल खंड-२ स्वीकारला. अनेक पदांच्या वेतन त्रुटी दूर. अधिकारी व…
Loksabha Election

Loksabha Election : लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून ‘हे’ 11 शिलेदार जवळपास निश्चित

Posted by - February 8, 2024 0
मुंबई : एकीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसंबंधी (Loksabha Election) जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकरे शिवसेना ठाकरे गटाने आपले 11 उमेदवार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *