Jaya Prada

Jaya Prada : अभिनेत्री जया प्रदांच्या अडचणीत वाढ! ‘या’ तारखेला न्यायालयात हजर करण्याचे दिले आदेश

974 0

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा (Jaya Prada) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जयाप्रदा यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. एका जुन्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार वॉरंट देऊनही जयाप्रदा न्यायालयात उपस्थित राहिल्या नाहीत, त्यामुळेच आता न्यायालयाने पोलीसांना जया प्रदा यांना अटक करून 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीसांना विशेष पथक तयार करून त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?
हे प्रकरण 2019 सालचं आहे. 2019 मध्ये जयाप्रदा यांनी भाजपच्या तिकिटावर रामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी जयाप्रदा 19 एप्रिल रोजी रामपूरच्या स्वारा पोलीस स्टेशन हद्दीतील नूरपूर येथे पोहोचल्या होत्या. मात्र याच काळात लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू होती. यावेळी त्यांनी रस्त्याचं उद्घाटन केलं होतं, त्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतरच त्यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

ही दोन्ही प्रकरणं रामपूरच्या न्यायालयात सुरू आहेत. जया प्रदा सलग अनेक सुनावणीत हजर राहिल्या नाहीत. त्यानंतरच त्यांच्याविरुद्ध एक एक अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं. असं असतानाही त्या न्यायालयात पोहोचल्या नाहीत, त्यामुळे आता त्यांना अटक करून हजर करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 28 वर्षीय तरुणाने पोलिस चौकीत स्वत:ला जाळून घेतले

Dattajirao Gaikwad : भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन

Suicide News : धक्कादायक! कंगनासोबत काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या

Pune News : स्वराज्य सप्ताह आणि शिवजयंती निमित्त दत्ता धनकवडे व आप्पा रेणुसे मित्रपरिवाराकडून भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Ashok Chavan : संजय राऊतांनी अशोक चव्हाणांच्या बाबतीत केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणी आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ ! न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय

Teacher Recruitment : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! 12 वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

Pune News : श्री गणेश जयंतीनिमित्त आज मध्य भागातील वाहतुकीत होणार ‘हे’ बदल

Pune News : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग

Share This News

Related Post

Amravati Crime

Amaravati Crime : दुहेरी हत्याकांडाने अमरावती हादरलं ! तरुणानं मेडिकल टर्मिनोलॉजीचा अभ्यास केला, अन् आईसह भावाला संपवलं…

Posted by - September 6, 2023 0
अमरावती : आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अमरावती जिल्ह्यतील (Amaravati Crime) मोर्शी येथे घडली आहे. अमरावती (Amaravati Crime)…
crime

Crime News : फोन चार्जला लावणं पडलं महागात, 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 26, 2023 0
सध्या एक धक्कादायक (Crime News) घटना समोर आली आहे. यामध्ये (Crime News) स्मार्टफोन वापरणे एका गर्भवती महिलेला चांगलंच महागात पडलं…
Akola News

Akola News : रागावून माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्यामुळे पतीने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

Posted by - August 18, 2023 0
अकोला : अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पतीने रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केली आहे. मूर्तिजापुरच्या…
Vaari

वारीमध्ये मुस्लीम व्यक्तीने धरला विठ्ठलाच्या भजनावर ठेका

Posted by - June 16, 2023 0
मुंबई : येत्या 29 जूनला आषाढी एकादशी आहे. यानिमित्त महाराष्ट्रातून अनेक वारकरी पायी वारी करत पंढरपुरात दाखल होत असतात. महाराष्ट्राच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *