Pune News

Pune News : स्वराज्य सप्ताह आणि शिवजयंती निमित्त दत्ता धनकवडे व आप्पा रेणुसे मित्रपरिवाराकडून भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

341 0

पुणे : रंग आणि रेषांच्या अनोख्या दुनियेत मुलं हरवून गेली आणि दोन तास कसे उलटले (Pune News) कळलेदेखील नाही. एका अनोख्या आणि रंगतदार वातावरणात आजची चित्रकला स्पर्धा भव्य स्वरूपात आयोजित केली गेली. मुलांच्या उदंड प्रतिसादाने स्पर्धेला भरगोस यश लाभले.निमित्त होते पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज्य सप्ताह आणि शिवजयंती निमित्त दत्ता धनकवडे व आप्पा रेणुसे मित्रपरिवार आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेचे!..

स्पर्धेचे उदघाटन आमदार मा. भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मा. दीपकभाऊ मानकर यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे सुरूवातीला दिपकभाऊंनी स्वतः पोवाडा सादर केला, तसेच छत्रपती शिवरायांचे सुंदर चित्र काढले आणि मग स्पर्धेला सुरुवात झाली.मुलांचा उत्साह तर शब्दांत वर्णन करण्याच्या पलीकडचा होता आणि शिक्षकांनीही स्पर्धेचे उत्तम संयोजन केलेले होते. अतिशय शिस्तबद्ध व देखणी अशी ही स्पर्धा झाली. दोन वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. धनकवडी, आंबेगाव, कात्रज परिसरातील 24 शाळांमधील 1340 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

मुलांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांवरील असणारे प्रेम आदर हे त्यांच्या ड्रॉइंग पेपरवर दिसत होते. यावेळी बोलताना आमदार भीमराव तापकीर यांनी शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या शिकवणी प्रमाणे कार्यरत असतो असे सांगितले.

दीपकभाऊ मानकर यांनी शिवाजी महाराज व शालेय शिक्षण यासंदर्भातील अत्यंत उपयुक्त माहिती दिली. त्यांनी स्वतः शिवाजी महाराजांवरील पोवाडा गाऊन सर्व विद्यार्थ्यांची मने जिंकली तसेच त्यांनी स्वतः शिवाजी महाराजांवरील सुंदर चित्र काढून स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उत्तम बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात येणार आहे. स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व रोख एक लाख एक हजार रुपयाची बक्षीस दिली जाणार आहे. हे बक्षीस मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

आभार प्रदर्शन माजी महापौर दत्ताभाऊ धनकवडे यांनी केले. याप्रसंगी माझ्यासह दत्ताभाऊ धनकवडे, माजी नगरसेवक दत्ता सागरे, सचिन डिंबळे, शंकर कडू, किशोर आवाळे, मधुकर कोंढरे, अनिल आवटी, मयूर संचेती, अभिराज रेणुसे,संदीप फडके, मंगेश साळुंखे, राजेंद्र बर्गे, आकाश वाडघरे, रूपाली मालुसरे, राजश्री निंगुने, स्पर्धाप्रमुख सुनील सोनवणे, संदीप भोसले,अक्षय लिम्हण, मनोज तोडकर, शिरीष चव्हाण व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ashok Chavan : संजय राऊतांनी अशोक चव्हाणांच्या बाबतीत केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणी आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ ! न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय

Teacher Recruitment : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! 12 वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

Pune News : श्री गणेश जयंतीनिमित्त आज मध्य भागातील वाहतुकीत होणार ‘हे’ बदल

Pune News : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग

Share This News

Related Post

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी;आईच्या निधनाचा धक्का झाला नाही सहन; 15 दिवस स्वतःला ..

Posted by - November 22, 2022 0
पिंपरी : स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतात ते सत्यच आहे. जगात अशी कोणतीच व्यक्ती नसेल जिला ही भावना…

पुणे : रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी युद्धपातळीवर कामे करा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - August 27, 2022 0
पुणे : शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर करावे आणि त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच उपलब्ध मनुष्यबळात आवश्यकतेनुसार वाढ करावी ,…
nitesh rane

संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार’, नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य

Posted by - May 7, 2023 0
मुंबई : संजय राऊत आणि राणे कुटुंब यांच्यातील वाद सर्वज्ञात आहे. यादरम्यान आता भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे…

कल्याणीनगर मध्ये पुन्हा हिट अँड रन; कारचा धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू 

Posted by - July 21, 2024 0
पोर्शे कार अपघातानंतर हादरून गेलेले कल्याणी नगर पुन्हा एकदा हिट अँड रन अपघातामुळे चर्चेत आले आहे. कल्याणी नगर मध्ये काल…

पत्रकाराच्या प्रश्नावर अजितदादा संतापले…..म्हणाले, ‘आम्ही घरात असलं करत नाही’

Posted by - March 31, 2023 0
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात वेगवेगळे गौप्यस्फोट करून धक्के दिले जात आहेत. पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला गौप्यस्फोट,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *