Ashok Chavan

Ashok Chavan : संजय राऊतांनी अशोक चव्हाणांच्या बाबतीत केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

490 0

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल काँग्रेसचा हात सोडत पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मीडियासमोर येत त्यांनी मी दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्यांनी आजच भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर संजय राऊतांनी अशोक चव्हाणांच्या बाबतीत एका मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?
पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या दृष्टीने युपीए काळात सगळ्यात मोठा घोटाळा हा आदर्श घोटाळा होता. त्याचे मुख्य सूत्रधार अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे, जनता तुमच्यावर थुंकत आहे. शहिदांच्या विधवा सुद्धा तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत. आदर्श घोटाळ्यावर हल्ला करणारे हेच भाजपचे लोक. नरेंद्र मोदींना भविष्यात देशामध्ये तोंड लपवून फिरावं लागेल. त्यांनी ज्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला त्यांनी मोदींनी भाजपमध्ये आणून पवित्र केले हे दुर्दैव आहे असेदेखील संजय राऊत म्हणाले आहेत.

हा केला गौप्यस्फोट
अशोक चव्हाण हे दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा चव्हाण यांनी शिंदे यांच्याबरोबरच भाजपाशी घरोबा करण्याची योजना आखली होती. अशोक चव्हाण हे गेल्या काही काळापासून पक्ष सोडण्यासाठी, भाजपात जाण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांना आता मुहुर्त मिळाला असेल असा टोलादेखील संजय राऊतांनी लगावला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणी आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ ! न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय

Teacher Recruitment : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! 12 वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

Pune News : श्री गणेश जयंतीनिमित्त आज मध्य भागातील वाहतुकीत होणार ‘हे’ बदल

Pune News : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग

Share This News

Related Post

Maharashtra Din 2024

Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी गमावले होते आपले प्राण

Posted by - May 1, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासात (Maharashtra Din 2024) डोकावताना नकळतच अनेक पैलू समोर येतात आणि गतकाळातील प्रत्येक घडामोड आपल्या डोळ्यांचं पारणं…
Ajit pawar Oath

Ajit Pawar : अजित पवारांसह राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते होते ईडीच्या रडारवर; मात्र आता सरकारमध्ये सामील

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ज्यामध्ये छगन…
LokSabha

TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट : ‘या’ आहेत देशातील ‘टॉप 10 हाय वोल्टेज’ लढती; दिग्गज नेत्यांपुढे विजयाचं आव्हान

Posted by - March 29, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्यापासून महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच लढतींचा आढावा आपण घेतलेला आहे. मात्र आज आपण देशातल्या टॉप टेन…

Breaking ! सज्जनगडावर जात असताना कार ८०० फूट खोल दरीत कोसळली, चालकाचा मृत्यू

Posted by - April 7, 2023 0
साताऱ्याहून सज्जनगडकडे निघालेल्या तवेरा गाडीचा सज्जनगडचा घाट चढत असताना तीव्र वळणावर अपघात झाला. या अपघातात तवेरा गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी…

पुण्यातील लतादीदींच्या बालमैत्रिणीकडून जुन्या आठवणींना उजाळा

Posted by - February 7, 2022 0
पुणे- ‘लता मनाने खूप मोठी होती, ती या जगात नाही यावर विश्वासच बसत नाही’. हे सांगताना लतादीदींच्या पुण्यातील बालमैत्रीण लीला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *