महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत असतात. अगदी क्षुल्लक कारणावरून ही भांडणे होत असतात. नुकताच महिलांच्या भांडणाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जिथे चालत्या बसमध्ये दोन महिला एकमेकींशी भांडत आहेत. यावेळी त्या एकमेकींना शिवीगाळ करत चक्क चपलेने मारताना दिसत आहेत. बंगळुरूमधील बीएमटीसी बसमधील ही घटना असल्याचे समजत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
Slipper-Kalesh b/w Two women Inside BMTC bus over Sliding the Glass , Bengaluru
pic.twitter.com/sBQA9oqOly— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 8, 2024
बेंगळुरूमधील बीएमटीसी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन महिला प्रवाशांमध्ये खिडकी सरकवण्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. खिडकीवरून झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही महिला एकमेकींना चक्क चप्पलने मारहाण करत आहेत. काही सेकंद त्या एकमेकींना चप्पलने मारहाण करतात. यावेळी बसमध्ये उपस्थित प्रवासी महिलांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात, पण त्या काही थांबण्याचे नाव घेत नाहीत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला उभी आहे तर दुसरी महिला सीटवर बसून भांडताना दिसत आहे. दोघीही एकमेकांना शिवीगाळ करत आहेत. यावेळी उभी असलेली महिला आधी चप्पलने मारण्यास सुरुवात करते, त्यानंतर सीटवर बसलेली महिलाही पायातील चप्पल काढून तिला मारू लागते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ketaki Chitale : लग्नाचा सल्ला देणाऱ्यांना केतकी चितळेने लगावला ‘हा’ टोला
Mohammed Shami : ‘माझ्या लेकीला भेटू देत नाही…’, मोहम्मद शमीचा पत्नीवर खळबळजनक आरोप
Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट
Abhishek Ghosalkar Muder : कोरोना योद्धा पुरस्कार विजेता मॉरिस कसा बनला मारेकरी
Pune Crime News : पुणे पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली; कुख्यात गुंड निलेश घायवळचे रिल्स व्हायरल
Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या
Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात