पुणे : पुणे पोलिसांनी सगळ्या गुन्हेगारांची परेड काढून सज्जड (Pune Crime news) दम दिला मात्र पुणे पोलिसांच्या आदेशाला “भाई लोकांच्या” कार्यकर्त्यांकडून केराची टोपली दाखवण्यात आली. मात्र गुन्हेगारांच्या परेड नंतरही पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी सुरुच असल्याचं दिसून आलं. सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स व्हायरल करण्याचा प्रकार अजूनही सर्रास सुरु आहे. पुणे पोलिसांनी हे जाहीरपणे सांगून काही तास उलटायच्या आतच गुन्हेगारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर गुंड निलेश घायवळ याचे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अपलोड करण्यात आले.
कोण आहे निलेश घायवळ?
निलेश घायवळ हा गजा मारणेच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा. त्याच्यावर पुण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. पुण्यातील कोथरुड परिसरातील सुतारवाडीत निलेश घायवळची दहशत होती. मात्र गजा मारणेशी बिनसल्यावर मारणे गॅंगने घायवळवर दोनदा हल्ले केले. त्याचं प्रत्युत्तर घायवळ टोळीने दिलं. अखेर दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करुन फिल्मी स्टाईलने हत्या केली.कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. 2019 मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला. बाकी गुन्ह्यातदेखील घायवळला जामीन मिळाला आणि 2023 मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या
Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात