मुंबई : माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Muder) यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या गोळीबाराच्या घटनेनंतर बोरिवलीच्या आय सी कॉलनीमधील रहिवाशांना मोठा धक्का बसला. कोरोना कालावधीमध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात समाजसेवा करणाऱ्या मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने घोसाळकरांवर 5 गोळ्या झाडून त्यांची हत्या करून नंतर स्वतःदेखील आत्महत्या केली.
कोण आहे मॉरिस भाई?
मॉरिस नरोन्हा हा मागील अनेक वर्षांपासून परदेशामध्ये वास्तव्यास होता. कोरोनाच्या लाटेआधी म्हणजेच 2019 च्या डिसेंबर महिन्याआधी तो आय सी कॉलनीमध्ये परतला होता. कोरोना काळात त्याने मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केलं. अनेकांना अगदी अन्नधान्य वाटण्यापासून ते बेड्स उपलब्ध करुन देण्यात मदत करण्याचं काम त्याने केलं. त्याच्या या कार्यसाठी त्याला कोरोना योद्धा म्हणून अनेक पुरस्कारही मिळाले. त्याच्या या समाजसेवेच्या कार्यामुळे लोकांमध्ये त्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
कोण आहेत अभिषेक घोसाळकर ?
अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकरांचा मुलगा आहे. दहिसरमधील तरुण नेतृत्व म्हणून अभिषेक घोसाळकर यांची ओळख होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर घोसाळकर कुटुंबांने उद्धव ठाकरेंना साथ दिली. अभिषेक घोसाळकर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक होते. अभिषेक घोसाळकर हे मुंबईतल्या दहीसरच्या कांदरपाडा प्रभागाचे नगरसेवक होते. घोसाळकर हे दोन वेळा नगरसेवक होते. ते मुंबई बँकेचे संचालकदेखील होते.
मॉरिसची राजकीय महत्त्वकांशा
मॉरिसची राजकारणामध्ये प्रवेश करण्याची होती. त्याची राजकीय महत्त्वकांशा काही लपून राहिली नव्हती. त्याचे स्थानिक स्थरावर सर्व पक्षीय नेत्यांशी चांगले संबंध होते. त्याने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली होती. जागोजागी त्याचे फलक लावण्यात आले होते. मॉरिसने निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केल्याने अभिषेक घोसाळकर यांच्यामध्ये राजकीय वैमानस्य निर्माण झाले होते.
‘त्या’ बालात्कार प्रकरणामुळे दोघांमध्ये उडाली ठिणगी
मध्यंतरी मॉरिस जवळपास साडेचार महिने बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगात राहून आला होता, अशी माहिती त्याच्या घटस्फोटीत पत्नीकडून देण्यात आली आहे. “जामीनावर तुरुंगातून सुटून घरी आल्यानंतर मॉरिस सारखा, ‘मी अभिषेक घोसाळकरला सोडणार नाही. मारून टाकणार!’ असं बोलायचा,” अशी माहितीही मॉरिसच्या पत्नीकडून देण्यात आली आहे. घोसाळकरांमुळे आपण बलात्कार प्रकरणात आत गेल्याची चीड मॉरिसच्या मनात होती.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Crime News : पुणे पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली; कुख्यात गुंड निलेश घायवळचे रिल्स व्हायरल
Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या
Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात