अकोला : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. फडणवीसांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचे त्यांनी आपल्या आरोपामध्ये म्हंटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील सत्तासंघर्षावेळी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलो होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी माझा गेम करण्याचा प्लॅन रचला होता, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.
नेमके काय म्हणाले नितीन देशमुख?
राज्यातील सत्तासंघर्षावेळी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलो होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी माझा गेम करण्याचा प्लॅन रचला होता, असा धक्कादायक आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला. शिंदे गटातील एका आमदारानेच मला ही माहिती दिली. त्याने सांगितले की, तुम्ही ज्यावेळी सुरतमध्ये होता, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: तुम्हाला ठार मारण्याचे षडयंत्र रचले होते. शिंदे गटासोबत सत्तास्थापन करण्याच्या प्लॅनमध्ये मी अडथळा ठरत असल्याने फडणवीस यांना माझा गेम करायचा होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सुरतमध्ये असताना मला हृदयविकाराचा झटका आल्याची खोटी बातमी प्रसारमाध्यमांना दिली, असा दावाही नितीन देशमुख यांनी केला.
नितीन देशमुख सुरतमध्ये असताना नेमकं काय घडले होते?
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांचा जो एक गट केला होता, त्यामध्ये नितीन देशमुख यांचा समावेश होता. मात्र, सुरतमध्ये नितीन देशमुख यांची प्रकृती अचानक बिघडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांच्या छातीत वेदना होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी नितीन देशमुख यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रारही पोलिसांकडे दिली होती. काही दिवसांनी नितीन देशमुख महाराष्ट्रात परतले होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे आणि भाजपवर आरोप केले होते. मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला तयार नसल्याने सुरतमध्येच माझा घात करण्याचा भाजपचा डाव होता. रुग्णालयात मला चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन टोचण्यात आले. माझ्या मागे पोलीस लावण्यात आले. तसेच डॉक्टरांच्या मदतीने मला ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता, असे आरोप नितीन देशमुख यांनी केले होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट
Abhishek Ghosalkar Muder : कोरोना योद्धा पुरस्कार विजेता मॉरिस कसा बनला मारेकरी
Pune Crime News : पुणे पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली; कुख्यात गुंड निलेश घायवळचे रिल्स व्हायरल
Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या
Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात