मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिली अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने मॉरिसचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याला अटक केली आहे. क्राइम ब्रँचने अमरेंद्र मिश्रा याला शस्त्रास्त्र कायदा 29 ब आणि 30 अंतर्गत अटक केली आहे. अमरेंद्र मिश्रा हा 3 ते 4 महिन्यापासून मॉरिसचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता.
अमरेंद्र मिश्राला का केली अटक?
मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला 2003 मध्ये यूपीच्या प्रयागराज मधील फुलपूर पोलिसांनी पिस्तुल परवाना जारी केला होता. त्या परवान्याची मुदत फेब्रुवारी 2026 पर्यंत होती. अमरेंद्र मिश्रा हा गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून मॉरिसचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. त्याच्या पिस्तुलाचा वापर तो स्वत: आणि मॉरिस दोघेही करत होते. अमरेंद्र मिश्रा त्याचे पिस्तूल मॉरिसच्या ऑफिसच्या लॉकरमध्ये ठेवायचा. कालही त्याने त्याच लॉकरमध्ये पिस्तूल ठेवले होते. त्याच लॉकरमधून मॉरिसने पिस्तूल काढून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. हा गोळीबार झाला तेव्हा अमरेंद्र मिश्रा घटनास्थळी उपस्थित नव्हता.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Viral Video : चालत्या बसमध्ये दोन महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; एकमेकींना चपलेने धुतले
Ketaki Chitale : लग्नाचा सल्ला देणाऱ्यांना केतकी चितळेने लगावला ‘हा’ टोला
Mohammed Shami : ‘माझ्या लेकीला भेटू देत नाही…’, मोहम्मद शमीचा पत्नीवर खळबळजनक आरोप
Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट
Abhishek Ghosalkar Muder : कोरोना योद्धा पुरस्कार विजेता मॉरिस कसा बनला मारेकरी
Pune Crime News : पुणे पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली; कुख्यात गुंड निलेश घायवळचे रिल्स व्हायरल
Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या
Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात