पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड असलेल्या नागरिकांसाठी एक खुश खबर आहे. या रेशन कार्ड धारकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेता येणार आहे. देशात आत्तापर्यंत केशरी आणि पिवळा रंगाचे रेशन कार्ड धारकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळत होता मात्र आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
या दोन्ही योजना रुग्णांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच या योजनेमध्ये पांढरे रेशन कार्ड धारकांचा समावेश व्हावा यासाठी सरकारने फेरविचार केला आणि आता ही योजना पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनाही लागू होईल या संदर्भातला शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे. पांढऱ्या रेशनकार्ड धारकांनासुद्धा ५ लाखांपर्यत मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.
आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य
या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डधारकांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करून घ्यावे लागणार आहे. यासाठी पांढरे रेशन कार्ड आधारकार्डला जोडण्याची मोहीम राबवावी, अशी सूचना अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी रेशन कार्डधारकांनी सुद्धा पुढाकार घेऊन त्यांचे रेशनकार्ड आणि आधार कार्डशी लिंक करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.