Raigad News

Raigad News : मत्स्यतलावात खाद्य टाकण्यासाठी गेले अन्.. बाप-लेकाचा तडफडून मृत्यू

984 0

रायगड : विजांच्या कडकडाटासह कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणा हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. रायगडमधील (Raigad News) अलिबागमध्येही पावसामुळं मोठी दुर्घटना घडली आहे. अंगावर वीज पडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

काय घडले नेमके?
रायगडमधील अलिबाग तालुक्यातील दिवलांग पेझारी येथील रात्री 9.30 वाजण्याच्या ही दुर्देवी घटना घडली आहे. रघुनाथ म्हात्रे आणि ऋषिकेश म्हात्रे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. दोघेही बाप-लेक संध्याकाळच्या वेळेस गावाजवळ असलेल्या मत्स्यतलावात खाद्य टाकण्यासाठी गेले असताना हि दुर्घटना घडली आहे. वीज पडल्यामुळं दोघेही गंभीर जखमी झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांच्या मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विक्रम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. पिता- पुत्रांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!