राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ लोकनेते शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला झाल्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाहीत कोणत्याही नेत्याच्या घरावर हल्ला होऊ नये.राज्य सरकारने एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संयम सुटला आहे.
पण हल्ला करणे हे निषेधार्ह आहे.असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
एस टी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. अनेक समस्या एस. टी कर्मचाऱ्यांना भेडसावत आहेत. त्यामुळे एसटी चे राज्य शासनात विलीन करण्याची मागणी पुढे आली.मी परिवहन मंत्री असताना एस टी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत होते.आता मात्र अनेक प्रश्नांनी एस टी कर्मचारी त्रस्त आहेत.त्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार ने दुर्लक्ष केले त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांचा संयम सुटला आहे.मात्र लोकशाहीत एखाद्या नेत्याचा घरावर हल्ला करणे निषेधार्ह आहे.शरद पवार यांच्या घरावर तीव्र निदर्शने करताना त्यांच्या घरावर झालेला हल्ल्याचा प्रकार तीव्र निंदनीय आणि निषेधार्ह आहे असे रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.