Rohan Bopanna-Rutuja Bhosale

Asian Games 2023 : रोहन बोपण्णा- ऋतुजा भोसले यांनी रचला इतिहास; टेनिस मिश्र दुहेरीत पटकावले सुवर्णपदक

775 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) सातव्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिसमध्ये सुवर्णपदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. भारताचे हे टेनिसमधील पहिले सुवर्णपदक आहे. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

काय घडले सामन्यात ?
रोहन बोपन्ना आणि ऋतुराज भोसले यांनी टेनिस मिक्स्ड डबलच्या फायनलमध्ये शानदार कामगिरी केली. बोपन्ना-भोसले जोडीने तैपेईच्या जोडीचा 2-6, 6-3 आणि 10-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले या जोडीने पहिला सेट गमावल्यानंतर दमदार कमबॅक केले. पहिल्या सेटमध्ये रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले यांना 6-2 च्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनतर या जोडीने दमदार कमबॅक केले. एन-शुओ लियांग आणि त्सुंग-हाओ हुआंग या जोडीचा भारताच्या जोडीने अखेरच्या दोन सेटमध्ये पराभव करत सामना जिंकला.

या स्पर्धेत भारताची आतापर्यंतची कामगिरी
रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले या जोडीने भारताला नववे गोल्ड मिळवून दिले. यामुळे भारताची पदकांची संख्या 35 वर पोहचली आहे. यामध्ये 9 सुवर्ण, 13 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!