भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया कप 2023 मध्ये (India vs Sri Lanka) खेळत आहे. टीम इंडियाची सर्वात मोठी ताकद म्हणजे, दमदार फलंदाजी. भारतीय फलंदाज नेहमीच गोलंदाजांना धूळ चारताना दिसतात. विशेषत: फिरकीपटूंना. याच कारणामुळे भारतात फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या उपलब्ध आहेत. पण कालच्या सामन्यात वेगळीच परिस्थिती पाहायला मिळाली. कालच्या सामन्यात टीम इंडियाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम झाला आहे.
काय आहे तो लाजिरवाणा विक्रम ?
एरव्ही प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर धुवांधार बरसणारे टीम इंडियाचे फलंदाज कालच्या सामन्यात मात्र ढेपाळल्याचं पाहायला मिळालं. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, टीम इंडियाच्या सर्वच्या सर्व 10 विकेट्स श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी घेतल्या. या सामन्यात 20 वर्षीय मिस्ट्री स्पिनर दुनिथ वेलालगे याने 5, ऑफस्पिनर चारिथ असलंकाने 4, तर ऑफस्पिनर महिष तीक्षणानं 1 विकेट घेतली. अशाप्रकारे, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघाविरुद्धच्या सर्व 10 विकेट फिरकीपटूंनी घेतल्या. टीम इंडियासाठीही हा एक लाजिरवाणा विक्रम आहे.
India overcome Dunith Wellalage's fighting all-round show to notch up second win in the Super 4 stage of #AsiaCup2023 👌#INDvSL 📝: https://t.co/BBkqm36Lj3 pic.twitter.com/UzWLGenICC
— ICC (@ICC) September 12, 2023
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात हे दहाव्यांदा घडलं आहे, जेव्हा फिरकीपटूंनी एकदिवसीय डावांत सर्व 10 विकेट्स घेतल्या आहेत. पण टीम इंडियाविरुद्ध कोणत्याही संघानं अशी कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याच मैदानावर 1997 मध्ये टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्ध फिरकी गोलंदाजीविरुद्ध 9 विकेट गमावल्या होत्या.