Pune News

Pune Porsche Accident : ‘त्या’ आरोपी मुलामुळे ‘या’ आमदाराच्या मुलाने सोडली होती शाळा

253 0

पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणामध्ये (Pune Porsche Accident) आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. यामध्ये त्या अल्पवयीन मुलाचे वडील राहुल अग्रवाल आणि या मुलाने ज्या ठिकाणी मद्यपान केलं त्या बार आणि पबच्या मालकांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालत आरोपींवर कठोर कारवाई करावी असे आदेश पोलिसांना दिले आहेत. यादरम्यान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांची पत्नी सोनाली तनपुरे यांनी एक पोस्ट करत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

काय केला खुलासा?
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांची पत्नी सोनाली तनपुरे यांनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट करत या प्रकरणात कार अपघातासाठी दोषी असलेला मुलगा हा आपल्या मुलाच्या शाळेतच होता असं म्हटलं आहे. या मुलाच्या ग्रुपमधील काही मुलांनी प्राजक्त तनपुरेंच्या मुलालाही शाळेत असताना त्रास दिला होता, असा दावा सोनाली यांनी केला आहे. इतकेच नाही तर हा त्रास एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की अखेर आम्ही मुलाची शाळा बदलली, असंही सोनाली तनपुरेंनी म्हटलं आहे.

नेमके काय लिहिले पोस्टमध्ये?
“कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंटनंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या… संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती, मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही,” असं सोनाली तनपुरे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन म्हटलं आहे. तसेच पुढे सोनाली यांनी, “शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता,” असंही म्हटलं आहे. “त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा,” असं सोनाली तनपुरे यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये नवीन नवीन खुलासे समोर येत असून राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणी दोषी असलेल्या सर्वांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर

Share This News

Related Post

Nikhil Wagle

Nikhil Wagle : निखिल वागळे यांच्या कारवर पुण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला

Posted by - February 9, 2024 0
पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) पुण्यात ‘निर्भय बनो’च्या कार्यक्रमासाठी व्याख्याता म्हणून उपस्थित राहण्यासाठी जात होते. यादरम्यान त्यांच्यावर…

पुणे बंद ! राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची तातडीने हकालपट्टी करावी या मागणीसाठी मंगळवारी पुणे बंद आणि मुकमोर्चा

Posted by - December 12, 2022 0
पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरून शिवाजी महाराजांची अवहेलना केल्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय…
Ranjit Taware

Pune District Bank : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पदी रणजीत तावरे यांची नियुक्ती

Posted by - November 8, 2023 0
पुणे : अजित पवारांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Pune District Bank) संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

Posted by - January 3, 2023 0
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन…

Jagdish Mulik : महापालिका निवडणुकीत 100 पेक्षा अधिक जागा जिंकून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार वाढदिवसाची भेट

Posted by - July 22, 2022 0
पुणे : येत्या महापालिका निवडणुकीत 100 पेक्षा अधिक जागा जिंकून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाची भेट देण्याचा निर्धार शहर भाजपचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *