पुणे : राज्य शासनाने शिक्षणात कायद्यात (Pune News) सुधारणा करून ‘खाजगी शाळांच्या परिसरात जर सरकारी अथवा अनुदानित शाळा असल्यास त्यांनी 25 टक्के राखीव मोफत प्रवेश करण्याची गरज नाही’ असा आदेश काढला आहे. या आदेशाला विरोध करण्यासाठी आम आदमी पार्टी तसेच विविध पालक संघटना आणि पालक यांनी रविवारी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर चौकामध्ये तीव्र निदर्शने केली.
या नव्या बदलामुळे गरीब मुलांना कुठल्याही खाजगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आता पूर्णपणे दुरावली आहे. या बदलामुळे वंचित आणि दुर्बल घटतातील मुले यांच्यासाठी सरकारी शाळा आणि श्रीमंतांसाठी खाजगी इंग्रजी शाळा अशी विभागणी होणार असून या पद्धतीमुळे शिक्षणातील सामाजिकीकरणाच्या उद्देशाला हरताळ फासला जाईल असा आरोप करण्यात आला. आर्थिक, सामजिक स्तरामुळे येणाऱ्या अडचणी दूर करत खाजगी शाळांमध्ये वंचित दुर्बल घटकासाठी 25% राखीव जागा ठेवणे हेच न्यायपूर्ण आहे. त्यामुळे सरकारने केलेली दुरुस्ती ही न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारी आहे असा आरोप आप प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला.
नवीन शिक्षण धोरणात पूर्व प्राथमिक शाळेपासूनच दहावीपर्यंत शिक्षण हे दर्जेदार आणि सर्वांना परवडणारे असावे व त्याची जबाबदारी सरकारवर असेल असे म्हटले आहे. त्यामुळे सरकारने सर्वप्रथम अनुदानित आणि सरकारी शाळांमध्ये इंग्रजीची सोय तसेच त्याचा दर्जा सुधारणे यावर लक्ष द्यायला हवे. असर , क्राय तसेच इतर संस्थांच्या सर्वे मधून सरकारी शाळांची दयनीय स्थिती उघड झालेली आहे, असे यावेळेस शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी संगितले.
खाजगी शाळांची प्रतिपूर्ती रक्कम वेळेत द्यायला हवी, त्यात उशीर झाल्यास खाजगी संस्थांना व्याज द्यायला हवे व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी योग्य ती काळजी सरकारने घ्यायला हवी, केंद्र सरकारकडून आलेला निधी इतरत्र वापरू नये अशी मागणी यावेळेस करण्यात आली. इतर राज्यांना जे जमते ते महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या सरकारला का जमत नाही असा सवाल पालक आघाडी च्या ललिता गायकवाड यांनी केला.
सरकारने हा बदल करणारा आदेश मागे घ्यावा अन्यथा अधिक तीव्र आंदोलन पालक करतील असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात आप राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, पालक आघाडी अध्यक्ष ललिता गायकवाड, सुरेखा भोसले, आरती करंजावणे, अमोल काळे, संतोष काळे, अविनाश केंदळे, श्रीकांत भिसे, चंद्रकांत गायकवाड, शिवाजी डोलारे, आसिफ मोमीन, सुनील सौदी, विकास गोलांडे, गिरीश नाईक, विकास चव्हाण, महेंद्र जाधव, संदीप सूर्यवंशी, प्रीतम कोंढाळकर, गोपी जोशी, विकास लोंढे, बिपिन अहिवळे, साहिल परदेशी, उमेश बोदले, अभिजीत वाघमारे, संदीप खरात, शिवराम ठोंबरे, उमेश बागडे, गुणाजी मोरे, राहुल तिवारी, रिजवान शेख, किरण कद्रे, अर्जुन साकोरे, अभिजीत मोरे, विक्रम गायकवाड, सोमनाथ गोडांबे, प्रदीप माने, शंकर थोरात, ज्ञानेश्वर गायकवाड, सुनील भोसले, उमेश दीक्षित, कुमार धोंगडे, हिना अन्सारी, समीना शेख, मनोज शेट्टी, किरण कांबळे, शमीम बागवान, मुमताज शेख, श्रद्धा शेट्टी, रेधान बागवान, अमित मस्के, मयूर कांबळे, निलेश वांजळे, संजय कटारनवरे, एम अली सईद, संजय रणधीर,अविनाश भाकरे, क्षमा गायकवाड, ॲनी अनिश, शितल कांडेलकर, स्नेहा लावंड, मंजुनाथ मनोरे, अक्षय शिंदे, सतीश यादव, प्रभाकर कोंढाळकर,संदीप धाडगे, ऋषिकेश मारणे, गणेश थरकुडे इत्यादी पालक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ritesh Deshmukh : काका पुतण्याचं नातं कसं असावं? रितेश देशमुखांनी दिलं उदाहरण
Onion Export Ban : मोठी बातमी! केंद्र सरकारने अखेर कांद्यावरील निर्यातबंदी उठवली
Concentration : एकाग्रता कमी पडतीय तर करा ‘हा’ व्यायाम; झटपट दिसेल बदल
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये मिनीबसचा भीषण अपघात
Supriya Sule : ‘हा भातुकलीचा खेळ नाही’; बारामतीच्या लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
Amravati Accident News : अमरावतीमध्ये भीषण अपघात ! चौघांचा मृत्यू तर 10 जण जखमी
Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत होणार मोठा बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद