BREAKING NEWS: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी गोळीबार! वाळू व्यावसायिकावर झाडल्या गोळ्या; नेमकं कारण काय ? वाचा सविस्तर

91 0

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्यातील एका वाळू व्यावसायिकावर गोळीबार झाल्याचे घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या या व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ती घटना पुण्यातील गंगाधाम परिसरामध्ये घडली.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनास्थळावरून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गंगाधाम परिसरामध्ये हे वाळू व्यावसायिक आले असता त्यांच्यावर दोन ते तीन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. या तरुणांनी दोन राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान संबंधित व्यावसायिक हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर हा हल्ला पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांची पथकं आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत.

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून भर चौकात, रहदारीच्या रस्त्यावर हा हल्ला झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Share This News

Related Post

कोलकत्ता बलात्कार प्रकरणात ट्विस्ट; आरोपी संजय रॉयने सुरक्षा रक्षकाला सांगितली वेगळीच कहानी

Posted by - August 25, 2024 0
कोलकत्यातील आर.जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार-हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याच्या विरोधात आणखी काही…

डॉ.दाभोलकर यांच्या मेंदू व छातीतून दोन बुलेट्‌स बाहेर काढण्यात आल्या; डॉ. तावरे यांची साक्ष

Posted by - April 28, 2022 0
शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत डॉ. दाभोलकर यांच्या मेंदू आणि छातीतून दोन बुलेट्‌स बाहेर काढण्यात आल्याचे ससूनचे तत्कालिन वैद्यकीय अधीक्षक डॉ. तावरेंनी न्यायालयाला…

VIRAL Video : महिलेला अश्लील शिवीगाळ करून दमदाटी करणे पडले महागात ; श्रीकांत त्यागी गजाआड

Posted by - August 9, 2022 0
Shrikant Tyachi Case : काही दिवसांपूर्वी श्रीकांत त्यागी याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. बेकायदेशीर बांधकामावरून एक महिला श्रीकांत त्यागी…

पुणे : जुन्नर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास राज्य शासनाकडून एक लाखांची मदत जाहीर

Posted by - September 29, 2022 0
पुणे : जुन्नर तालुक्यातील आत्महत्या केलेले शेतकरी दशरथ केदारी यांच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत द्यावी, यासाठी आज पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे विधान…

“मै मानता ही नही हु कि मै राज्यपाल हु…!” राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय ?

Posted by - December 10, 2022 0
पुणे : सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्राचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *