Loksabha Election

Pune Loksabha : मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास निश्चित केलेले १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य; यादी केली जाहीर

195 0

पुणे : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळख जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत १३ मे रोजी मावळ, पुणे आणि शिरूर या तीन मतदारसंघात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी ही माहिती दिली आहे. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे अशा मतदारांनी मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदारांनी मतदार ओळखपत्र सादर करावेत.

छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार छायाचित्र ओळखपत्र असल्यास मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत न्यावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

IPL : KKR ला मिळाले प्लेऑफचे तिकीट; प्लेऑफमध्ये पोहोचणारा ठरला पहिला संघ

Pune Loksabha : पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या 1500 तक्रारींवर केली कार्यवाही

Pune Loksabha : लोकसभा निवडणूक मतदानादिवशीचे आठवडे बाजार राहणार बंद

 

Share This News

Related Post

Monsoon Update

Monsoon Update : शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! ‘या’ जिल्ह्यांत आज बरसणार पाऊस

Posted by - August 31, 2023 0
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याने (Monsoon Update) शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले…

Kashmir Ganpati : काश्मीरमधील दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

Posted by - September 21, 2023 0
पुणे : काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची (Kashmir Ganpati) दीड दिवसाच्या विसर्जनाने सांगता झाली. पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह प्रमुख मानाच्या…

#PUNE : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन

Posted by - February 24, 2023 0
पुणे : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी पुण्यात…

इच्छुकांनो तयारीला लागा! महापालिकांसाठी 29 जुलैला आरक्षण सोडत

Posted by - July 23, 2022 0
ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळं रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालाय. यासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर…

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक (व्हिडिओ)

Posted by - January 29, 2022 0
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *