kolkata night riders

IPL : KKR ला मिळाले प्लेऑफचे तिकीट; प्लेऑफमध्ये पोहोचणारा ठरला पहिला संघ

696 0

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 18  धावांनी पराभव करून केकेआरने नववा विजय प्राप्त करून 18  गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. यासोबत कोलकाता आयपीएल 2024 सीझनच्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.

अवकाळी पावसामुळे सामना दोन तास 15 मिनिट उशिराने सुरू झाला होता. अचानक पाऊस पडल्यामुळे सामना 16-16 षटकांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सामन्यात मुंबईकडून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. केकेआर संघाने १६ षटकांत सात विकेट गमावून 157  धावा केले. केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने 21 चेंडूंमध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 42 धावा केले. नितीश राणाने 33 धावा केले, रसेल ने 24 धावा केले, आणि रिंकू सिंग ने 20 धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन जायची कामगिरी केली.

158 लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामीच्या जोडीने वेगवान सुरुवात केली. मात्र, पॉवरप्ले संपताच सुनील नरेनने इशानला बाद करून मुंबईला पहिला धक्का दिला. त्यापुढे मुंबईच्या एक एक प्लेयरची विकेट पडत गेल्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune Loksabha : पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या 1500 तक्रारींवर केली कार्यवाही

Pune Loksabha : लोकसभा निवडणूक मतदानादिवशीचे आठवडे बाजार राहणार बंद

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!