शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक (व्हिडिओ)

174 0

पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे. खोडवेकर यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे. प्रशासकीय सेवेतील मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एस. हाके यांनी सुशील खोडवेकर यांना अटक केल्याची माहिती दिली आहे. आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर हे उपसचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत आहेत. यापूर्वी पुणे सायबर पोलिसांनी शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर व प्रितीश देशमुख यांना अटक केली आहे.

सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून पुणे सायबर पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज (शनिवार) दुपारी शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

मोठी बातमी : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला; हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू

Posted by - March 3, 2023 0
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर चार अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकला बाहेर पडले…

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; अधिवेशनात ‘हे’ मुद्दे गाजणार

Posted by - March 3, 2022 0
आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11…

सदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी बालविवाह रोखण्याची मोहिम राबवण्याचे रूपाली चाकणकर यांचे निर्देश

Posted by - June 9, 2022 0
  समाजातील वाढती बालविवाहाची कुप्रथा रोखणे हे सर्वांचे कर्तव्य असून सदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवावी, असे प्रतिपादन…

सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आता प्रादेशिक भाषेत; सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची घोषणा

Posted by - January 26, 2023 0
सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय विविध भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये देण्याची सेवा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बुधवारी सुरू केली. गुरुवारी, प्रजासत्ताक दिनापासून हे…

‘सकल हिंदू समाज’च्या वतीने रविवारी हिंदू जनआक्रोश मोर्चा

Posted by - January 18, 2023 0
पुणे:  सकल हिंदू समाजच्या वतीने येत्या रविवारी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *