ajit pawar and supriya sule

Supriya Sule : अजित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले चोख उत्तर

290 0

बारामती : बारामतीच्या विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. भोर इथं सभेत बोलताना अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंची नक्कल केली होती. मी केलेली कामं खासदार त्यांचे फोटो लावून सांगत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता. अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांची मिमिक्रीसुद्धा केली होती. त्यांच्या या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, ते टीम वर्क आहे आणि आम्ही सगळे एकत्र होतो, एकत्र काम केलं आहे. 17 वर्ष आम्ही एकत्र काम केलं होतं. दादा माझ्या पेक्षा पदाने, वयाने, नात्याने खूप मोठे आहेत. आपण मोठ्यांना आदर-सन्मान द्यायचा असतो आणि तो मी देते. कदाचित दादांनी माझ अहवाल वाचला नसेल. सगळ्यांनी मी, दादा ,संग्राम सगळ्यांनी 18 वर्ष काम केलं आहे. एमआयडीसीचं उदघाटन साहेबानी केलं आहे असे सुप्रिया सुळे म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक

Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!