Sanjay Ghodke

Sanjay Ghodke : ठाकरेंचे कट्टर समर्थक संजय घोडकेंचे निधन; पंढरपूरचे ‘आनंद दिघे’ अशी होती ओळख

636 0

सोलापूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान तालुकाप्रमुख तथा पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष संजय दशरथ घोडके (वय 60) (Sanjay Ghodke) यांचे आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

पंढरपूर मधील शिवसेनेच्या स्थापनेपासून संजय घोडके यांचा संघटनात्मक कामात सहभाग आहे. शाखा प्रमुखापासून त्यांचा शिवसेनेतील प्रवास सुरु झाला. पंढरपूर शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आदी पदावर त्यांनी निष्ठेने आणि धाडसाने काम केले. ते लहानपणापासून दिवंगत धर्मवीर आनंद दिघेंचे मोठे चाहते होते. विशेष बाब म्हणजे, त्यांना पंढरपूरचे आनंद दिघे म्हणून देखील ओळखले जात होते.

शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या ब्रीदवाक्यशी सुसंगत घोडके यांचे कार्य होते. राजकारण, समाजकारण, गोरगरीब, निराधार आदींमध्ये मामा म्हणून संजय घोडके यांची ओळख होती. धर्मवीर आनंद दिघे कला व क्रीडा मंडळ, स्व. मीनाताई ठाकरे नवरात्र महोत्सव मंडळाची स्थापना घोडके यांनी केली होती. परीट समाजाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. घोडके यांच्या अकाली निधनाने पंढरपूर शिवसेनेसह सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.

Share This News

Related Post

Gondia News

Gondia News : गोंदिया हळहळलं ! 3 शिक्षक मित्रांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 16, 2023 0
गोंदिया : गोंदियामधून (Gondia News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गोंदिया (Gondia News) जिल्ह्यात मोठी खळबळ…
Dattajirao Gaikwad

Dattajirao Gaikwad : भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन

Posted by - February 13, 2024 0
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड (Dattajirao Gaikwad) यांनी मंगळवारी 13 फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी…

मुंबईत मनसेच्या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळला, राज ठाकरे सुरक्षित ( व्हिडिओ )

Posted by - February 19, 2022 0
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमा दरम्यान सभेसाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ कोसळल्याची घटना घडली आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात ही घटना घडली…
BJP

Pune News : पुणे शहर भाजपकडून कार्यकारणी जाहीर

Posted by - September 18, 2023 0
पुणे : पुणे शहर (Pune News) भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीमध्ये  उपाध्यक्ष,सरचिटणीस,चिटणीस आणि विविध सेलचे अध्यक्ष…
Uddhav Thackeray

Maharashtra Politics : ठाकरे गटाला मोठा धक्का ! ‘हा’ निष्ठावंत शिलेदार सोडणार साथ

Posted by - June 1, 2024 0
नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुका (Maharashtra Politics) पार पडणार आहेत. मात्र त्या अगोदरच राजकीय घडामोडींना वेग आला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *